स्मार्टफोनच्या फिटनेस अॅप्स सध्या युजर्सच्या नव्या पर्सनल ट्रेनर बनल्या आहेत. मात्र हे अॅप्स खरंच व्यक्तीला फीट ठेवण्यास यशस्वी आहेत का?
फीटनेसबद्दल लोकांमध्ये असलेल्या उत्सूकतेमुळे फीटनेस अॅप्सचे बाजारसुध्दा वेगाने वाढत आहेत. तुमच्याजवळ कोणत्याही ऑपरेटींग सिस्टीमचा स्मार्टफोन असला तरी तुम्हाला हजारो फीटनेस अॅप्स उपलब्ध आहेत. मात्र या अॅप्सच्या वाढत्या लोकप्रियतेसोबत हे अॅप खरंच उपयोगी आहेत का असा प्रश्नही समोर येत आहे.
कसे असतात हे अॅप
सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या अॅप्समध्ये वर्कआऊट प्लान ठरवल्या जाऊ शकतो. यामध्ये धावणे, चालणे, सायकल चालवणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. तसेच काही अॅप खाण्या-पिण्यासंदर्भातील माहिती देतात. यामुळे तुम्हाला तुमचा डाएट ठरवता येतो. या अॅप्समध्ये काय खावे, काय खाऊ नये, किती प्रमाणात खावे, त्याचे फायदे काय अशा अनेक गोष्टींची माहिती दिलेली असते. तसेच असे काही अॅप आहेत, ज्यामुळे तुमच्या फीटनेस सोबतच तुम्हाला खेळाचेही पर्याय देतात.
किती फायदेशीर आहेत हे अॅप
संशोधनातून अशी माहीती समोर आली आहे की, या फीटनेस अॅप्सचा मुख्य उद्देश युजर्सला आरोग्याबद्दल जागरूक ठेवणे आणि त्यांना आरोग्या संदर्भात माहिती देणे असा आहे. या अॅपचा सर्वात जास्त फायदा हाच आहे की, तुम्ही किती कॅलरी खर्च करता आणि तुम्हाला अजून केवढ्या व्यायामाची गरज आहे याबद्दल ह्या अॅप्स माहिती देतात. अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न मेडिसीनने केलेल्या अभ्यासानुसार, खाण्या-पिण्यासंदर्भातील अॅपमुळे लोकांनी साधारणपणे 7 किलोपर्यंत वजन कमी केले आहे. याच प्रकारे काही अॅप्स धावण्याचे अंतर, वेग, रस्ता आणि या दरम्यान शरीरात खर्ची पडणार्या कॅलरी यांचा हिशेब ठेवतात. यामुळे युजरचा वर्कआऊट शेड्यूल व्यवस्थित राहतो. संशोधनात असे सुध्दा म्हटले आहे की, या अॅपच्या साह्याने व्यक्तीला फीटनेस बाबतीत फायदा नक्कीच होतो, मात्र आपल्या फीटनेस संदर्भात युजरलाच जास्त प्रयत्नशिल राहणे गरजेचे आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, लोकप्रिय फीटनेस अॅप्सबद्दल...