आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एचपी’:16 हजार कर्मचार्‍यांना नारळ; संगणकाची मागणी घटल्याचा परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- एप्रिलअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये संगणकनिर्मितीत आघाडीवर असलेल्या हॅवलेट पॅकार्ड या कंपनीला महसुलात तोटा सहन करावा लागला आहे. आर्थिक चणचणीत सापडलेल्या या कंपनीने अखेर नोकर कपातीचे हत्यार उपसले आहे. पुनर्बांधणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून कंपनीने आता अतिरिक्त 11 ते 16 हजार नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्थिक अडचणीचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या एचपी कंपनीने 2012 मध्येच पुनर्बांधणी प्रक्रियेला सुरुवात केली असून त्यानुसार अव्वल दर्जाची 24 हजार नोकर कपात करण्याची योजना आखली आहे. नवीन नोकर कपातही त्याचाच एक भाग आहे.

संगणक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होऊन उद्दिष्टांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने आपल्या कर्मचारी मनुष्यबळाची पुनर्रचना करण्याचे काम एचपी कंपनीने कायम सुरू ठेवली आहेत. त्यामुळे कंपनीतील पदे रद्द करण्याची संख्या 11 ते 16 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.

31 आॅक्टोबरअखेर एचपीच्या जागतिक पातळीवरील कर्मचारी मनुष्यबळ : 3,17,500
भारतावर परिणाम : डिव्हाइस आणि नेटवर्किंग या दोन क्षेत्रांमध्ये भक्कम स्थान असलेल्या एचपीने नोकर कपातीचा भारतावर नेमका परिणाम काय होईल हे आताच सांगता येणार नाही, असे म्हटले आहे.

स्मार्टफोन, टॅबमुळे वांधे : पारंपरिक कॉम्प्युटरच्या तुलनेत ग्राहक आता स्मार्टफोन, टॅबकडे जास्त वळत असल्याने एचपीसारख्या संगणक उत्पादक कंपन्यांची डोकेदुखी वाढत आहे. कारण मोबाइल बाजारपेठेवर अ‍ॅपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांचे वर्चस्व जास्त आहे.