आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HTC Desire| 526G Plus Octa Core Smartphone Launched In India

10400 रुपयांमध्ये लॉन्च झाला ऑक्टा-कोर प्रोसेसर असलेला HTC Desire 526G+

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - HTC कंपनीने भारतात त्यांच्या डिझायर सीरिजचा तीसरा फोन लॉन्च केला आहे. HTC डिझायर 526G+ नावाचा हा स्मार्टफोन ऑक्टा कोअर प्रोसेसरवर काम करतो. तसेच मल्टीटास्कींगसाठी यामध्ये 1GB रॅम देण्यात आली आहे.
किंमत आणि केव्हा बाजारात येईल-
HTC डिझायर 526G+ हा दोन प्रकारात मिळेल. या फोनच्या 8GB स्मार्टफोनची किंमत 10400 रुपये तर 16GB इंटर्नल मेमरी असलेल्या फोनची किंमत 11400 रुपये अशी ठेवण्यात आली आहे. HTC चा हा डिझायर फोन ऑनलाईन एक्सक्लूसिव्ह स्ट्रेटेजीनुसार स्नॅपडीलवरून विकत घेता येईल. दे दोन्ही फोन शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

यापूर्वी कंपनीने याच महिन्यात HTC डिझायर 310 या नावाने डिझायर 320 चे नवे व्हेरिएंट लॉन्च केले होते. आणि यासोबतच एंड्रॉइड लॉलीपॉपवर काम करणारा पहिला HTC फोन डिझायर 826 सुध्दा लॉन्च केला होता. डिझायर 826 मध्ये चांगल्या ऑपरेटींग सिस्टीमसोबतच अल्ट्रापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, या फोनचे फीचर्स...