आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Htc Desire Eye May Launch Today 13 Mp Front Camera

13 MP च्या फ्रंट कॅमेरासह आज लॉन्च होणार HTC चा सेल्फी फोन DESIRE EYE?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(HTC द्वारा पोस्ट करण्यात आलेला HTC DESIRE EYE चा फोटो)

HTC कंपनीचा पहिला बहुचर्चित सेल्फी स्मार्टफोन आज (बुधवार) लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सॅमसंग, सोनी, नोकिया यासारख्या अनेक भारतीय कंपन्यांनीही एका पाठोपाठ एक सेल्फी फीचर्सने अद्ययावत फोन लॉन्च केले आहेत.
HTC कंपनीचा न्यूयॉर्कमध्ये एक इव्हेंट होत आहे. इव्हेंटमध्ये 'HTC Desire Eye' (लीक झालेले नाव) लॉन्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. HTC ने या इव्हेंटला 'डबल एक्सपोझर' असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, HTC ने मागील वर्षी ड्युअल रिअर कॅमेर्‍याने अद्ययावत HTC ONE M8 लॉन्च केला होता. त्यामुळे या इव्हेंटमध्ये ड्युअल रिअर कॅमेर्‍याचे अपडेट व्हर्जन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. HTC ने पाठवलेल्या इन्व्हिटेशनमध्ये 'फेड सेल्फी' सादर केली आहे. यामुळे HTC चा नवा फोन लेटेस्ट कॅमेरा फीचर्ससह येण्याची शक्यता आहे. याशिवाय सेल्फी फोटो पाहून ते सेल्फी फोनचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा-
HTC च्या इव्हेंटविषयी माहिती देताना लीकस्टर '@upleaks' ने ट्विटर पर HTC च्या नव्या फोनची माहिती पोस्ट केली आहे. @upleaks नुसार, न्यू HTC DESIRE EYE हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट सेल्फी फोकस कॅमेर्‍याने परिपूर्ण असेल. शिवाय वाइड अँगलसोबत अपेर्चर f/2.0 देण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, HTC DESIRE EYEचे लीक झालेले फीचर्स...