आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1st LOOK: आयफोनला टक्कर देणारा HTC M7चे फोटो लीक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

HTC कंपनीचा लेटेस्ट अँड्राइड फोन M7 मोबाईलचे लॉचिंगच्या आधीच फोटो आणि व्हिडिओ नुकताच लीक झाला आहे. तरुणाईमध्ये या HTC M7 बाबत खूप उत्सूकता आहे. परंतु HTC M7 लॉन्च होण्याआधीच कंपनीचे सीईओ पीटर चू यांच्याकडूनच चुकून या मोबाईलचा व्हिडिओ लीक झाला आहे.

एचटीसीचे सीईओ पिटर चू यांनी एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यांनी पार्टी दरम्यान आपल्या सहकार्‍यांचे छायाचित्र घेण्यासाठी नवा M7 खिशातून बाहेर काढला. तेवड्यात तेथे उपस्थित असलेल्या विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी M7 ला त्यांच्या कॅमेरात कैद केले. या फोनचा लीक झालेला फोटो TomsHardware ने प्रसिध्द केला होता.

एचटीसी M7 बाबतीत गॅजेटच्या दुनियेत अनेक अफवा पसरल्या आहेत. यात 1.7 GHz चे क्वॉड कोअर प्रोसेसर असून हा फोन अँड्राइड जेली बिन ऑपेरेटींग सिस्टिमवर कार्य करतो. TomsHardware नुसार M7 चा स्क्रीन 468 पिक्सल आहे. विशेष म्हणून या फोनची इंटरनल मेमरी 32 GB आहे. या फोनमधील कॅमेर्‍याची क्वॉलिटी लाजवाब आहे. मुख्य कॅमेरा 13 तर फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. बॅटरी 2300 एमएएचची आहे. फोनचा लूकही स्टायलीश आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा कसा दिसतो हा HTC M7 आणि माहित करून घ्या त्याचे खास फीचर्स....