आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LATEST: लॉन्च होण्याआधीच लीक झाले तीन कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनचे फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'HTC' कंपनीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन ONE M8 न्यूयॉर्कमध्ये लॉन्च होण्‍याच्या तयारीत असताना त्याचे फीचर्स लीक झाले आहेत. HTC चा हा महत्त्वाकांक्षी स्मार्टफोनला तीन कॅमेरे आहेत. मात्र, M8 हा फोन लॉन्च होण्याआधीच त्याचा 'यू ट्यूब'वर 14 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करण्‍यात आला आहे. हंस मेअर याने HTC ONE M8 चे ‍सविस्तर स्पेसिफिकेशन रिव्हू व्हिडिओ रुपात पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे.

2014 च्या सुरुवातीलाच HTC च्या या महत्त्वाकांक्षी स्मार्टफोनबाबतची माहिती इंटरनेटवर व्हायरल झाली होती. तीन कॅमेरा असलेला स्मार्टफोनबाबत गॅझेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे M8 मध्ये HTC ब्लिंकफीड यूजर इंटरफेसदेखील आहे.