Home | Business | Gadget | htc smart mobile phone

आठ मेगापिक्‍सल कॅमेरा असलेला एचटीसीचा स्मार्टफोन

दिव्‍य मराठी | Update - Jun 22, 2012, 11:54 PM IST

एचटीसी-वन एस मध्ये कनेक्टिव्हिटी फीचरच्या स्वरूपात थ्रीजी, ब्ल्यूटूथ- 4.0 ,वायफाय - 802.11 आणि जीपीएस-एजीपीएस सुविधा उपलब्ध आहेत.

  • htc smart mobile phone

    एचटीसीचा स्मार्टफोन एचटीसी-वन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला. याचा 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असून सर्वप्रथम कंपनीने हा फोन 2012 मध्ये झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केला होता. एमोल्ड स्क्रीन असलेल्या मोबाइलमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत.
    याची बॅटरी 1650 एमएएचची असून याचा बॅकअप खूप चांगला आहे. याला ऑटो फोकस, शूटिंग मोड आणि एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग अशी वैशिष्ट्ये यात असल्याने कंपनी स्मार्टफोन बाजारात मजबूत स्थान निर्माण करू इच्छिते. एचटीसी-वन एस मध्ये कनेक्टिव्हिटी फीचरच्या स्वरूपात थ्रीजी, ब्ल्यूटूथ- 4.0 ,वायफाय - 802.11 आणि जीपीएस-एजीपीएस सुविधा उपलब्ध आहेत. कंपनीने याची किंमत 33 हजार 590 रुपये इतकी ठेवली आहे.
    याच्या हँडसेटमध्ये 1.7 गीगाहर्टझ डायल कोअर एस 3 प्रोसेसर लावण्यात आला आहे. याचे वजन 119 ग्रॅम इतके असून याची जाडी फक्त 7.8 एमएम इतकी आहे. याची टचस्क्रीन साइझ 4.3 इंच आहे.

Trending