आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LEAKED: बचत आणि स्‍टाईल, 'एचटीसी वन' स्‍मार्टफोन आता नव्‍या रंगात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या स्‍मार्टफोनचा जमाना आहे. प्रत्‍येकाचा कल स्‍टायलिश स्‍मार्टफोन खरेदी करण्‍यावर भर आजकाल दिसून येतो. कोणाला मोठ्या स्‍क्रीनचा फोन आवडतो. तर कोणाला आकर्षक बॉडीकडे कल असतो. त्‍यामुळे शानदार डिझाईन आणि स्‍मार्ट फिचर्स असल्‍यास फोन वापरण्‍याचा आनंद द्विगुणित होईल.

स्‍मार्टफोनमध्‍ये सॅमसंग, अ‍ॅपल या कंपन्‍यांचे नाव आघाडीवर आहे. मायक्रोमॅक्‍सनेही भारतात जबरदस्‍त मुसंडी मारली आहे. या स्पर्धेत एचटीसी ही कंपनीही मागे नाही. एचटीसीनेही अनेक फिचर्सने सज्‍ज असलेले आकर्षक स्‍मार्टफोन्‍स बाजारात आणले आहेत.

एचटीसीचा 'एचटीसी वन' हा स्‍मार्टफोन सध्‍या अतिशय लोकप्रिय झाला आहे. या फोनला कंपनीने आता आणखी आकर्षक स्‍वरुप दिले आहे. आतापर्यंत हा फोन मेटॅलिक बॉडीमध्‍ये येत होता. आता लाल रंगात अतिशय आकर्षक लुक्‍समध्‍ये फोन कंपनीने बाजारात आणला आहे. विविध ऑनलाईन शॉपिंग साईट्स या फोनवर विविध ऑफर्स देत आहेत. लाल रंगाच्‍या फोनसाठी प्री ऑर्डरही घेणे सुरु आहे.

या फोनची वैशिष्‍ट्ये जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...