(HTC One M8 चा फोटो)
गॅजेट डेस्क - HTC त्यांच्या नवा
स्मार्टफोन 8 ऑक्टोबरला लॉन्च करणार आहे. मात्र कंपनीने
आपल्या या नव्या प्रोडक्टबद्दल अजून कोणताच खुलासा केलेला नाही. कंपनीच्या या नव्या प्रोडक्टची लाँचिंग न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.
HTC त्यांचा स्मार्टफोन One M8 चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार अशी सध्या चर्चा सुरू आहे. माध्यमांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रावर कंपनीने त्यांच्या नव्या प्रोडक्ट लॉन्च बद्दल सांगितले आहे, मात्र यात प्रोडक्टचे नाव जाहिर करण्यात आलेले नाही. आमंत्रण पत्रिका पाहून तरी असेच वाटत आहे की, हा नवा प्रोडक्ट असून त्यात कॅमेर्याची महत्त्वाची भूमिका आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, एचटीसीच्या या कार्यक्रमाबद्दलची माहिती
(सर्व फोटो केवळ सादरीकरणासाठी घेण्यात आले आहेत)