आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी रक्ताने चार्ज होणार स्मार्टफोनची बॅटरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम (स्वीडन) - वारंवार मोबाईलची बॅटरी कमी होत असल्यामुळे वैतागलेल्या लोकांसाठी आनंदाची आणि थोडी विचित्र बातमी आहे. स्वीडनच्या संशोधनकर्त्यांनी केलेल्या संशोधनात मानवी रक्ताच्या साह्याने स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करण्याचा फॉर्मूला शोधून काढला आहे. यामुळे केवळ स्मार्टफोनच नाही तर इतर कोणत्याही प्रकारची बॅटरी चार्ज करता येऊ शकते. विशेष म्हणजे रक्त ही अशी नैसर्गिक गोष्ट आहे ज्याची मानवाला कधीच कमी भासत नाही.
त्यामुळे उर्जेच्या माध्यमातून प्रदुषण आणि विषारी रसायने उत्सर्जीत होणार नाहीत. स्वीडनच्या सेरगे स्लीव आणि मॅगनस फाल्क यांनी ज्याप्रकारे द्राक्षांच्या मदतीने बॅटरी चार्ज करता येते, नेमकी तशीच पध्दती विकसीत केली आहे. हे दोन्ही संशोधक रक्ताच्या साह्याने काम करेल असे पेसमेकर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.