आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्युंदाईच्या ‘ग्रँड’ चे फीचर्स आय-10 व 20 सारखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रँड आय-10च्या रूपात ह्युंदाईने पाचवे मॉडेल बाजारात उतरवले आहे. आय-10 आणि आय-20 च्या काही वैशिष्ट्यांचा समावेश करून या मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. चालू महिन्याच्या 3 तारखेला लाँच झालेले हे मॉडेल घेण्यासाठी आतापर्यंत 10 हजारांपेक्षा जास्त बुकिंग झाली आहे. भारतीय बाजारात या मॉडेलसाठी आता जागाच शिल्लक नसल्याचा मतप्रवाह तज्ज्ञांमध्ये होता तरीसुद्धा या कारने जोरदार मुसंडी मारली आहे. हे मॉडेल जगात सर्वप्रथम भारतात सादर करण्यात आले.

युरोपियन बाजारात ते येणार नाही. तिथे आय-10 पेक्षाही लहान मॉडेल सादर करण्यात येणार आहे. या मॉडेलचे नावही जरा हटकेच आहे. ह्युंदाई ग्रँड आय-10 म्हणजे आय-10 पेक्षा मोठे मॉडेल. हे मॉडेल आय-10 पेक्षा बरेचसे वेगळे असले तरी यांच्यात थोडेफार साम्यही आहे.


ग्रँड आय-10 मॉडेलचे व्हीलबेस आय-10 पेक्षा 100 मिमी लांब आहे. स्टोअरेज क्षमताही चांगली असून त्यात भरपूर सामान ठेवता येऊ शकते. पुढच्या सीटला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. 1.1 सीआरडीआय डिझेल इंजिन हे कारच्या उत्तम वैशिष्ट्यांपैकी एक असून शहरातील रस्त्यांवर ड्रायव्हिंगसाठी ते अनुकूल ठरते. यापासून 70 बीएचपी ऊर्जेची निर्मिती होते. कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. पॉवर स्टिअरिंग इलेक्ट्रिकल असून वजनाने हलके आहे. एकंदरीतच या मॉडेलच्या वैशिष्ट्यांमुळे बाजारात त्याच्यासाठी भरपूर संधी आहेत.