आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोम्बार्गिनी गॅलेर्डोचा पर्याय ‘हुराकेन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोम्बार्गिनी गॅलेर्डोच्या जागी हुराकेन लाँच करण्यात आली आहे. नव्या कारमुळे कंपनीच्या विक्रीत वाढ होण्याची आशा आहे. इंटेरिअर व डिझाइनशिवाय या कारमध्ये अनेक फीचर्स आहेत. लोम्बार्गिनी गॅलेर्डोपेक्षा ही जास्त सरस ठरेल, अशी कंपनीला आशा आहे.

- लोम्बार्गिनी हुराकेन फ्लोअरपासून ते एअर व्हेंट्सपर्यंत उच्च तंत्रज्ञानाने संपन्न आहे. कारमध्ये इंफोटेनमेंट स्क्रीनची जागा एलईडी इंस्ट्रूमेंटने घेतली आहे. चाकात सगळ्या नियंत्रण क्षमता असल्याने स्टॉल्कपण नाहीये. याचे स्टार्टर बटण फायटर जेटने प्रेरित आहे.

- नवी कार लोम्बार्गिनी गॅलेर्डोला पर्याय म्हणून लाँच करण्यात आली आहे. या कारला लोम्बार्गिनी गॅलेर्डोपेक्षा अधिक पसंती मिळण्याची खात्री कंपनीला आहे. या कारचे पहिले सादरीकरण जिनिव्हा मोटार शोमध्ये होईल.

- लोम्बार्गिनीच्या परंपरेला कायम ठेवत या कारचे नावही फायटिंग बुलच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या कारचे डिझाइन अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. पाहताक्षणी कोणालाही याची टेस्ट ड्राइव्ह घेण्याचा मोह होईल. कारचे लूक्स अत्यंत आकर्षक आहेत.

- हुराकेनचे एरोहेड नोझ, शार्प एज आणि ड्रॉप ऑफ टेल या फीचर्समुळे ज्युनियर एव्हेंटाडोर म्हणायला हवे. एव्हेंटाडोरप्रमाणेच एअर डॅम आणि ग्लास एरियावर हेक्सागॉनल थीम आहे.

- इंटेरिअरमध्ये नावीन्य आणण्यासाठी बरेच बदल केले आहेत. सेंटर कन्सोलवर अँग्युलर बटण, एअर व्हेंट््स आहेत. यात 12.3 इंचांची एक टीएफटी स्क्रीन आहे. हे नवे इक्विपमेंट स्टिअरिंग व्हीलच्या मागे लावलेल्या ट्रॅडिशनल अ‍ॅनालॉगच्या जागी देण्यात आले आहे.

- इतर लोम्बार्गिनीत न वापरलेले हायब्रीड अ‍ॅल्युमिनियम आणि कार्बन फायबर कन्स्ट्रक्शन हुराकेनच्या बनावटीत वापरण्यात आले आहे. सेंटर टनल आणि रिअर फायरवॉलची बनावट सिंगल कार्बन फायबर मोल्डिंगची आहे. त्यामुळे पूर्वीच्या कारच्या तुलनेत याची बनावट 50 टक्के अधिक मजबूत व 10 टक्क्यांनी हलकी आहे.

- याच्या फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हीलवर अनेक नवे कंट्रोल आहेत. हेडलाइट, इंडिकेटर आणि वायपर कंट्रोलही स्टिअरिंग व्हिलवर आहेत.
- 3 मिनिटांतच कार ताशी 100 किलोमीटर वेगाने धावते. याचा सर्वाधिक वेग ताशी 320 किलोमीटर आहे. यात 5.2 लिटर व्ही-10 इंजिन आहे, जे पॅसेंजर सेलच्या अगदी मागे आहे.

- हुराकेनमध्ये सेव्हन स्पीड ड्युएल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. याला लोम्बार्गिनी डॉपिया फ्रिजिऑन असे नाव आहे. अडॉप्टिव्ह नेटवर्क इंटेलिजेंट मॅनेजमेंट (एनिमा) सिस्टिम याची खासियत आहे. हे फेरारी मॅनेटिनोप्रमाणे आहे. हे स्टिअरिंग व्हीलवरील बटणाने ऑपरेट करता येते. स्ट्राडा, स्पोर्ट आणि कोरसा या तीन ड्रायव्हिंग मोडमुळे गिअरबॉक्स किंवा फोर-व्हील-ड्राइव्हपैकी एक पर्याय निवडता येतो.

- इलेक्ट्रिक मोटार हे डायनामिक स्टिअरिंगचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.