आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्युसंगची जीडी 250 एन स्टायलिश बाइक लवकरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युसंगचे लेटेस्ट मॉडेल ‘जीडी 250 एन ’ स्टाइलिश बाइक आहे. या बाइकला हाताळणे सोपे आहे. ब्रेक्सही जबरदस्त आहेत. मात्र, गिफ्टशिफ्ट करणे अद्यापही थोडे अवघड आहे. पॉवर डिलिव्हरी पण काही खास नाही. ही बाइक नुकतीच दिल्ली येथील ऑटो एक्स्पोत सादर करण्यात आली. याच महिन्यात बाइक रस्त्यांवर दिसू लागेल. यात सगळेच फीचर्स असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे बाइक्समध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होईल.

- बाइक पाहताक्षणीच तिची स्लिम बॉडी, कॉम्पॅक्ट डिझाइन प्रभावी वाटते. या बाइकची बनावट आकर्षक आहे.
- बाइकच्या 10-स्पोक अलॉय चाकांना पांढरी फिनिशिंग देण्यात आली आहे. थाई ग्रिल मजबूत बनवण्यासाठी टँक कव्हर आहे. याचे फ्यूएल लीड एका कोपर्‍यात चालकाच्या जवळ आहे. यात डिसेंट स्विचगिअर, चांगली पाम ग्रिप आणि लिव्हर रिस्पॉन्स शानदार आहे.
- बाइकच्या मिररमधून वाइब-फ्री रिअर व्ह्यू दिसू शकतो. बाइकच्या प्रिझमाकृती हेडलाइटमधून रस्ता स्पष्ट दिसतो. यात पायलट लॅम्पही आहेत.
- बाइकमध्ये डिजिटल डिस्प्ले आहे. यात स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ऑडोमीटर, ड्यूएल ट्रिप मीटर, फ्यूएल गॉज, क्लॉक आहे.
- हँडबार गरजेनुसार खाली करून रायडिंग पोश्चर बदलता येते.
- यात मशिन्ड अलॉय फुटरेस्ट आणि एलईडी टेल लॅम्प आहे.
- ही बटण स्टार्ट बाइक असून यात 249 सीसी, फोर-स्ट्रोक , लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे.
- केटीएम 200 होंडा सीबीआरला टक्कर देऊ शकेल.