आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्युंदाई सेडान निर्मिती क्षेत्रात प्रवेश करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ह्युंदाई मोटर इंडियाने ‘एक्सेंट’ही मोटार दाखल करून छोटेखानी सेडान मोटार निर्मिती क्षेत्रात प्रवेश करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. ही नवीन मोटार मार्चपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. मारुती डिझायर, होंडा अमेझ आणि टाटा मोटार्सची येणारी झेस्ट या मोटारींना एक्सेंट टक्कर देणार आहे.
मोटारींच्या विक्रीमध्ये 1.2 टक्क्यांनी घसरण झालेली असली तरीही यंदाच्या वर्षात विक्रीमध्ये सकारात्मक वाढ होण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. एक्सेंट या जागतिक दर्जाच्या मोटारीची निर्मिती भारतीय बाजारपेठेसाठी करण्यात आली आहे. दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची कंपनीची भूमिका असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सेओ यांनी सांगितले. एक्सेंट पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंधन पर्यायांमध्ये उपलब्ध असली तरी कंपनीने त्यांची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. ग्रँड आय 10 च्या धर्तीवरच नव्या सेडान कारची निर्मिती करण्यात आली आहे.
ह्युंदाईची नजर सेडान सेगमेंटवर
एक्सेंटच्या माध्यमातून झपाट्याने वाढत असलेल्या छोटेखानी सेडान मोटारींच्या बाजारात कंपनी प्रवेश करीत आहे. गेल्या वर्षात छोट्या सेडान मोटारींच्या विक्रीत 39 टक्क्यांनी वाढ होऊन ती 24 हजार मोटारींवर गेली. त्यामुळे या गटात स्थान निर्माण करण्याचा मानस कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश र्शीवास्तव यांनी व्यक्त केला. कंपनीची सध्याला वार्षिक 6.75 लाख मोटारींचे उत्पादन करण्याची क्षमता असून त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला आहे.