हुदांईची छोटी कार दिवाळीपर्यंत बाजारात

agency

Jun 06,2011 03:15:21 PM IST

कोरियाची आघाडीची कंपनी हुदांईने छोटी कार बाजारात लवकरात लवकर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असून, पावसाळ्यानंतर म्हणजेच दिवाळीपर्यंत ती ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हुदांई कंपनीने या छोट्या कारचे नाव एच-८०० असे ठेवले असून त्याची रस्त्यावर सध्या चाचणी घेतली जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने अधिक माहिती न देता फक्त ही कार सर्वांधिक मायलेझ देईल, असे म्हटले आहे. तसेच तिची किमत खूपच कमी असेल. पेट्रोल कमी कसे लागेल यावर आम्ही भर देत असून मारुती कंपनीची स्वस्त कार बाजारात येण्याआधीच आम्ही कार ग्राहकांपर्यंत पोहचवू. ज्यामुळे आम्हाला बाजारात मोठा उठाव मिळेल व कंपनीला फायदा होईल.X
COMMENT