आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्युंदाईच्या कार महागल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाढता उत्पादन खर्च आणि चलनदरातील अस्थैर्य यामुळे ह्युंदाई मोटार इंडियाने आपल्या सर्व कारच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या इ ऑन ते सँटा एफई कार चार ते वीस हजारांनी महागल्या. ही वाढ तत्काळ लागू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ह्युंदाईचे उपाध्यक्ष (विक्री व मार्केटिंग) राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अस्थैर्य आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे सर्व कारच्या किमती 4,201 ते 20,878 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. ह्युंदाईच्या एंट्री लेव्हल हॅचबॅक इ ऑनची किंमत 2.77 लाख ते 3.83 लाख रुपये असून लक्झरी एसयूव्ही सँटा एफईची किंमत 22.61 लाख ते 25.63 लाख रुपये (दिल्ली एक्स शो-रूम) आहे. किंमतवाढीनंतर इ ऑन 5000 रुपयांनी महाग झाली आहे.

किंमतवाढीचे सत्र :
ह्युंदाईच्या आधी मारुती-सुझुकी कंपनीने सर्व कारच्या किमतीत जानेवारीमध्ये वाढ केली होती. त्यानंतर होंडा कार, टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने कारच्या किमती वाढवल्या.