दहा वर्षांपूर्वीच तयार / दहा वर्षांपूर्वीच तयार होते आयपॅडचे डिझाइन !

प्रतिनिधी

Jul 22,2012 03:01:31 AM IST

लंडन- अँपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी दहा वर्षांपूर्वीच आयपॅडचे डिझाइन तयार केले होते. मात्र, याबाबत त्यांनी कधीही खुलासा केला नव्हता. त्यांच्या मृत्युपश्चात आता आयऑन अँपल या वेबसाइटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यातील एका लेखात जॉब्स यांचा उल्लेख करत म्हटले आहे की, आयफोनआधीच आयपॅड तयार करण्यात आला होता.
आयपॅड 2010 मध्ये बाजारात सादर करण्यात आला होता. त्याआधी दोन वर्षांपर्यंत आयपॅड सध्या निर्मिती व संशोधनाच्या प्रक्रियेतच असल्याचे सांगितले जात होते. मात्र अँपलचा आयपॅड आपल्या खास बाजाराच्या प्रतीक्षेत होता. जॉब्स त्यात सातत्याने सुधारणा व नवनवीन फीचर्स जोडत होते.
जॉब्स सांगतोय आयपॅडची कहाणी
वेबसाइटनुसार जॉब्स म्हणतात की, ‘मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो.’ मी बर्‍याच वर्षांपूर्वी टॅब्लेटवर काम सुरू केले होते. आयपॅडचा डिस्प्ले मल्टीटच असावा, ज्यामुळे बोटांनीच त्यावर लिहिता येईल, अशी माझी इच्छा होती. सहकार्‍यांशी चर्चा करून त्यांना डिस्प्ले साकार करण्यास सांगितले. सहा महिन्यांनंतर डिस्प्ले तयार करून झाला. त्यावर आणखी काम व्हावे, तो आणखी स्मार्ट करता यावा म्हणून मी एका जबाबदार सहकार्‍याकडे तो सोपवला. डिस्प्लेवर सहकार्‍यांसह काम करत असताना मला जाणवले की, यापासून तर आम्ही फोनही तयार करू शकतो. मग काय? आम्ही आयफोनच्या कामाला लागलो. 2007 मध्ये पहिला आयफोन बाजारात आला. यानंतर बाजारातील रंगढंग पाहून 2010 मध्ये आयपॅडचे लाँचिंग केले.
न्यू आयपॅड चीनमध्येही
अँपलने आपला न्यू आयपॅड चीनमध्येही लाँच केला आहे. दरवेळेप्रमाणे या वेळी अँपलची उत्पादने विकत घेण्यासाठी दुकानांपुढे लांबलचक रांगा लागल्या. अँपलने नुकतेच चीनची कंपनी शेंजेंनविरुद्धचा पेटंटचा वाद 60 दशलक्ष डॉलर्स देऊन मिटवला आहे.

X
COMMENT