आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइस्क्रीम कंपन्यांत रंगणार फ्लेव्हरचे युद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशभरात आता वैशाख वणव्याची चाहूल लागली आहे. आइस्क्रीम कंपन्या हा हंगाम कॅश करण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरच्या शीतयुद्धात रंगल्या आहेत. या युद्धामुळे आगामी काळात आइस्क्रीम बाजारात नव-नवे फ्लेव्हर (स्वाद) ग्राहकांना चाखायला मिळणार आहेत.

कंपन्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळी हंगामात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आंबा फ्लेव्हरवर कंपन्यांचा भर आहे. आंबा फ्लेवरचे जास्तीत जास्त उत्पादने बाजारात आणण्याची कंपन्यांची तयारी आहे. या अंतर्गत किमान डझनभर फ्लेव्हर बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय फॅमिली पॅक आणि प्रीमियम सेगमेंटमध्येही ग्राहकांना या उन्हाळ्यात नवीन उत्पादने चाखायला मिळणार आहेत.

आइस्क्रीमच्या एकूण वार्षिक विक्रीत एप्रिल ते जुलै या महिन्यांचे 40 ते 45 टक्के योगदान असते. चालू वर्षात ट्रायकोनमध्ये पिस्ता, बदाम, चेकर्समध्ये व्हॅनिलाचा ब्लॅक करंट आणि केरेमलच्या मिश्रणाचा समावेश राहील. वाडीलाल इंडस्ट्रीजचे मुख्य संचालक राजेश गांधी यांच्या मते, उन्हाळी हंगामाबरोबरच नव्या कलानुसार उत्पादने सादर करण्याची कंपनीची तयारी आहे. आर्टिसन ब्रँड अंतर्गत आर्टिसनल केक, पेस्ट्रीज आणि आइस्क्रीम सँडविच हे यंदाचे आकर्षण ठरणार आहे. फलाल आम चस्का सादर करण्यात आला असून यात आइसकँडीमध्ये हापूस आंब्याचा गर असणारा स्वाद निवडीची मुभा राहील. पार्टी केक श्रेणीत केरेमल क्रंच, हापूस आंबा आणि अंजीर हे नवे स्वाद सादर करण्यात आले आहेत.