आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीआयसीआयकडून देशातील पहिल्या ब्रँच ऑन व्हील्सचा शुभारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - बँकेत मिळणा-या सर्व सेवा एका व्हॅनमधून देणा-या देशातील ब्रँच ऑन व्हील्सचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आयसीआयसीआय बँकेने हे पाऊल टाकले असून बँकिंग सुविधा नसलेल्या गावात या व्हॅनच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे.


बँकेचे कार्यकारी संचालक राजीव सभरवाल यांनी यावेळी सांगितले की, राज्यात आयसीआयसीआयच्या 560 शाखा असून देशातील एकूण शाखांच्या 17 टक्के शाखा महाराष्‍ट्रात आहेत. यापैकी 103 शाखा ग्रामीण भागात आहे.


सर्वसामान्यांच्या परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या दारात बँक पोहोचण्याची गरज आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात ही सेवा देऊन पुढचे पाऊल टाकले असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. आता या ब्रँच ऑन व्हील्सच्या माध्यमातून आधार कार्डचे वितरण करण्याबाबतही बँकेने विचार करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.


व्हॅनमध्ये एटीएम मशिनही
ही व्हॅन ठराविक गावात ठराविक वेळी थांबेल. या व्हॅनमध्ये एटीएम मशिन, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, 3 जी कनेक्शनसहित लॅपटॉप, एलइडी टीव्ही, लॉकर, प्रिंटर, पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम, बनावट धनादेश शोधू शकणारा यूव्ही लॅम्प, नोटांची मोजणी करणारे, सत्यता पडताळणारे मशिन याचा या व्हॅनमध्ये समावेश आहे.