आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICICI Bank Hike ATM Charge From Next Year 1 January

ICICI चे ATM वापरणे महागले, इतर बॅंकाही लवकरच करतील घोषणा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- खासगी क्षेत्रातील देशातील सगळ्यात अग्रेसर बॅंक ICICI ने ATM च्या वापरावर ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करण्याची घोषणा केली आहे. एक जानेवारी 2015 पासून शुल्क आकारले जाणार आहे. ATM वापरण्यावर बचत खातेदारांकडूनही शुल्क वसूल केले जाणार आहे.
नव्या नियमावलीनुसार, ग्राहकांना एका महिन्यात फक्त पाच वेळा विनाशुल्क एटीएमचा वापर करता येणार आहे. तसेच इतर बॅंकाचे एटीएम वापरण्याची फक्त तीन वेळाच मुभा देण्यात आली आहे. ICICI बॅंकेने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

ICICI ने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षात ग्राहकांना फक्त पाच वेळा एटीएमचा वापर विनामुल्य करता येईल. सहाव्या व्यवहारावर 20 रुपये (सेवा कर अतिरिक्त) शुल्क आकारले जाईल. तसेच बॅलेन्स चेक केल्यावर 8 रुपये 50 पैसे शुल्क आकारले जाईल.

अन्य बँकांच्या वापरावर शुल्क...
ICICI बॅंकांच्या ग्राहकांना अन्य बॅंकांच्या ATM वर फक्त तीन वेळा विनामुल्य व्यवहार करता येणार आहे.