आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICICI Bank Interest Collection Agency Cheated 200 Crores Service Tax

आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज वसुली करणा-या संस्थांनी बुडवले 200 कोटींचा सेवा कर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयसीआयसीआय बँकेसाठी काम करणा-या जवळपास दोन हजार कर्ज वसुली संस्थांनी सुमारे 200 कोटींचा सेवा कर बुडवला असल्याचे केंद्रीय अबकारी गुप्तचर महासंचालनालयाने म्हटले आहे. आतापर्यंत जवळपास 25 कोटी रुपयांचा कर बुडवल्याची प्रकरणे केंद्रीय अबकारी गुप्तचर महासंचालनालयाकडे आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत आयसीआयसीआय बँकेने या संस्थांना दोन हजार कोटी रुपयांची रक्कम वितरित केली होती, परंतु या संस्थांनी रकमेवरील सेवा कर अद्याप भरलेला नाही. या कर बुडवणा-यांमध्ये महाराष्‍ट्रातील 400 संस्थांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.


अन्य बॅँका आपल्या एजंटांना स्वतंत्रपणे सेवा कर अदा करतात, या संस्था सेवा कर खात्याकडे ती रक्कम भरतात, परंतु आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या कमिशनच्या रकमेमध्ये सेवा कराचादेखील समावेश असतो. त्यामुळे हा कर भरण्याची या संस्थांची जबाबदारी असते, याकडे महासंचालनालयाच्या अधिका-यांनी लक्ष वेधले. आमच्याकडून पाठवण्यात आलेल्या समन्सलादेखील काही जणांनी प्रतिसाद दिलेला नसून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई राष्‍ट्रीय पातळीवर करण्यात येत असून त्यासंदर्भात आयसीआयसीआयशीदेखील संपर्कात आहोत. याबाबतची चौकशी सुरू झाल्यानंतर आयसीआयसीआय बॅँकेकडून महासंचालनालयाला तपशील देण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. काही एजंटांच्या करण्यात आलेल्या चौकशीमध्ये 20 कोटी रुपयांचा कर बुडवल्याचे त्यांनी कबूल केले आहे, असेही ते म्हणाले.


जबाबदारी एजंटांची
यासंदर्भात आयसीआयसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, सेवा कराच्या नियमानुसार या प्रकरणामध्ये सेवा कर भरण्याची जबाबदारीही सेवा पुरवठादार अर्थात या संस्थांची असते. या संकलन करणा-या संस्थांबरोबर झालेल्या
बँकेच्या करारानुसार बॅँकेकडून एजंटांना देण्यात येणा-या एकूण कमिशनमध्ये सर्व प्रकारच्या करांचादेखील समावेश असतो. त्यामुळे संबंधित सेवा कर अदा करणे हे संकलन करणा-या एजंटांची जबाबदारी असते.


राष्ट्रीय पातळीवर कारवाई
महासंचालनालयाच्या अधिका-यांनी सांगितले, आमच्याकडून पाठवण्यात आलेल्या समन्सलादेखील काही एजंटांनी प्रतिसाद दिलेला नसून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई राष्‍ट्रीय पातळीवर करण्यात येत आहे.