आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ICICI, HDFC Raise Rates; Home, Auto Loans To Get Costlier

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एचडीएफसी, आयसीआयसीआयचे कर्ज महागले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या दोन्ही बँकांनी आपल्या मूळ कर्जदरात 0.25 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या बँकांचे गृह आणि वाहन कर्जासह इतर कर्ज महागले आहे.

आयसीआयसीआय बँकेने आपल्या मूळ कर्जदरात 0.25 टक्के वाढ केली. आता बँकेचा कर्जदर 9.75 टक्क्यांवरून 10 टक्के झाला आहे. नवे व्याजदर शुक्रवार, दि. 23 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. फ्लोटिंग व्याजदरावर गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

बँकेने प्राइम लेंडिंग दरातही किरकोळ वाढ केली आहे. मात्र, स्थिर व्याजदाराने (फिक्स्ड) घेतलेल्या कर्जावर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे आयसीआयसीआय बँकेने स्पष्ट केले.

खासगी क्षेत्रातील आणखी एक दिग्गज एचडीएफसी बँकेने कर्जदराच्या व्याजात 0.25 टक्के वाढ केली आहे. ज्या ग्राहकांनी 30 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचे कर्ज घेतले आहे त्या कर्जदारांना आता 10.40 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे.

सध्या हे दर 10.15 टक्के आहेत, तर ज्या ग्राहकांनी 30 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेतले आहे त्यांना आता 10.65 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. नवे व्याजदर 23 ऑगस्टपासून लागू होतील, असे एचडीएफसी बँकेने स्पष्ट केले.

ठेवीच्या दरातही वाढ
आयसीआयसीआय बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रुपयाला सावरण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे बँकांसमोर रोख रकमेची चणचण भासत आहे. त्यामुळे कर्जावरील व्याज वाढवणे आणि मुदत ठेवींवरील व्याज आकर्षक करून ठेवी मिळवणे असे दोन पर्याय बँकांसमोर आहेत. आयसीआयसीआय बँकेने 46 ते 60 दिवसांच्या एफडीवरील व्याज 0.75 टक्क्यांनी वाढवून 7 टक्के केले आहे, तर 61 ते 289 दिवसांच्या एफडीवरील व्याज 7.75 टक्के केले आहे.