आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ICRA Expects Auto Industry To Post 11 12% Revenue Growth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कच्चा माल स्वस्त झाल्याने वाहन उद्योगाला दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अबकारी शुल्क सवलतीचा आधार हरपल्यानंतर वाहनांच्या किमती वाढल्यामुळे जानेवारीत मोटारींची विक्री काहीशी मरगळल्यासारखी झाली. त्यातूनही मारुती सुझुकी आणि ह्युंदाई या कंपन्यांनी सकारात्मक वाढ दाखवली असली तरी अन्य कंपन्यांच्या विक्रीत मात्र घसरण झाली आहे. असे वातावरण असले तरी कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे उत्पादन खर्चही कमी होणार असून त्याचा फायदा वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणार्‍या उद्योला होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील १२ ते १८ महिन्यांत वाहनांना पुन्हा मागणी येण्याचा अंदाज ‘इक्रा’ने
व्यक्त केला आहे.

मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने, प्रवासी मोटारी या भागात कार्यरत असलेल्या मूळ उपकरण उत्पादकांच्या कामगिरीत सुधारणा होऊन वाहन उद्योगाच्या महसुलामध्ये ११ ते १२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाजही इक्राने व्यक्त केला आहे.

वाहन क्षेत्रातील मूळ उपकरण उत्पादकांचे स्थानिकीकरणाचे वाढते प्रमाण, मेक इन इंडिया धोरण त्याचबरोबर नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये व्यवसाय विस्तारण्याचा वाहन पुरवठादारांकडून केला जाणारा प्रयत्न आदी विविध कारणांमुळे वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणार्‍या उद्योगाच्या महसुलात मध्यावधी काळात वाढ होण्याची अपेक्षा इक्राने व्यक्त केली आहे. त्याचा फायदा वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणार्‍या उद्योगाला होणार आहे.

संशोधनावरील खर्च वाढणार
वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी २०१३-१४ या वर्षात आपल्या एकूण विक्रीच्या तुलनेत ०.६ टक्के खर्च हा संशोधन आणि विकासावर केला होता; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणार्‍या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून स्पर्धा तीव्र झाल्यामुळे संशोधन आणि विकासावरील खर्च आणखी वाढणार असल्याकडे ‘इक्रा’ने लक्ष वेधले आहे.