आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयडीबीआयची आरजीइएसएस योजना सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राजीव गांधी इक़्विटी सेव्हिंग स्कीमच्या धर्तीवर आयडीबीआयची उद्यापासून ( तां ९) आयडीबीआय आरजीइएसएस योजना सुरु होत असून सर्वसामान्य आणि छोट्या गुंतवणूक दारांना करबचत आणि वृद्धी
असे दोन्ही फायदे देणारी आहे.

ज्या सामान्य लोकांनी अद्याप शेअर बाजारात प्रवेश केलेला नाही त्यान त्यात सामावून घेण्याचा या योजनेचा हेतू आहे. याबाबत आयडीबीआय असेट कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष सरथ सरमा यांनी सांगितले की केंद्राने दिलेल्या सुचनेनुसार
दहा रुपये दर्शनी किमतीची युनिट विकली जाणार असून या योजनेत कमाल ५० हजार रुपये गुंतविल्यास निम्म्या रकमे इतका म्हणजे २५ हजार रुपये प्राप्तीकर वाचणार आहे. गुंतवणूक तीन वर्षासाठी असेल. अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केलेय
आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही ही योजना अमलात आणत आहोत. या योजनेत जमा होणारी रक्कम सरकारी उद्योगांच्या समभागात गुंतविले जाणार आहेत. बी एसइ -१००, सिएन एक्स -१०० मध्ये अंतर्भूत कंपन्यांच्या शेअर मध्येही रक्कम गुंतवली जाणार आहे. ही योजना नऊ मार्च अखेर सुरु राहणार असून प्राप्तीकर खात्याच्या कलम ८० सीसीजी अंतर्गत कर सवलत मिळणार आहे.

जागतिक स्थिती,महागाई आणि रुपयाचे मुल्य या तीन बाबींचा विचार करता यापुढेही सोन्यातील गुंतवणूक चांगला परतावा देणारी ठरेल असे स्पष्ट करून ते म्हणाले की पारंपारिक स्वरूपात लोकांकडे असलेले सोने अर्थव्यवस्थेत यावे यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना चांगल्या आहेत. त्याचा परिणाम देशाची चालू खात्यावर असलेली तुट नियंत्रित करण्यात होऊ शकेल. आगामी अर्थसंकल्प कसा असेल असे विचारता ते म्हणाले की आर्थिक सुधारणांना आणखी वेग मिळेल अशी अपेक्षा असून व्याज दर कमी होतील आणि देशाचा विकास दर पाच ते साडेपाच टक्के राहील.