आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयडीबीआयचे कर्ज स्वस्त, मूळ कर्जदरात 0.25 टक्के कपात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आरबीआयने रेपो दरात पाव टक्का कपात केल्यानंतर आयडीबीआय बँकेने मूळ कर्ज दरात 0.25 टक्के कपात केली आहे. यामुळे बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त झाले. ठरावीक मुदत ठेवींवरील व्याजातही पाव टक्का कपातीचा निर्णय आयडीबीआयने घेतला. नवे दर एक फेब्रुवारीपासून लागू होतील, असे आयडीबीआयने म्हटले आहे.

आरबीआयच्या कपात धोरणानंतर कर्ज स्वस्त करणारी आयडीबीआय पहिली बँक ठरली. स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कर्ज स्वस्त करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड या विदेशी बँकेनेही मूळ कर्ज दरात 0.75 टक्क्यांनी कपात केली आहे. आरबीआयने केलेली कपात अपेक्षित होती. त्याला प्रतिसाद देत आम्ही कर्ज स्वस्त केल्याचे रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने म्हटले आहे.