आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Marathi Movies Get Suitable Slot It Will Might Good For Business Says Ritesh Deshmukh

मराठी चित्रपटांना निश्चित वेळ मिळाली तर यश निश्चित- रितेश देशमूख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात मराठी चित्रपटास निश्चित खेळ (स्लॉट) मिळाले तर काय होऊ शकते हे दुनियादारीने खिडकीवर जमवलेल्या कोट्यवधी रुपयांनी सिध्द झाले आहे. सध्या मराठी चित्रपटाना चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. भांडवल ही आमची अडचण नसून स्लॉट आणि भक्कम कथानक हे आव्हान पेलणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता आणि आता निर्मात्याच्या भूमिकेत आलेला आघाडीचा कलाकार रितेश देशमुख याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

फ्लाम्बोज टाव्हर्न या फेररचित कॉर्पोरेट लाऊंजचे उदघाटन शुक्रवारी सायंकाळी ग्रॅन्ड मस्ती या 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या कलाकारांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी रितेशने ही माहिती दिली. तो निर्माता असलेला 'लई भारी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दुनियादारी चित्रपट बॉक्स ऑफिस वर तुफान लोकप्रिय झाला. याविषयी विचारता तो म्हणाला, की सशक्त कथानक ही गेले काही दिवस मराठी चित्रपटाची जमेची बाजू ठरते आहे. केवळ हिंदी चित्रपटासाठी प्रेक्षक 200 रुपये मोजून येतो. हा समज खोटा ठरला असून 15-20 कोटी रुपयांचा व्यवसाय आमचे मराठी चित्रपट करू शकतात, हे सिध्द झाले आहे. मात्र, त्यासाठी चित्रपटगृह चालक मालकांनी निश्चित स्लॉट द्यायला हवेत. ज्‍यांचे कथानक मजबूत आहे, अशा चित्रपटांकडे तरुण पिढी चित्रपटाकडे वळते. यातून अशा चित्रपटाची एक नवी जातकुळी (जॉनर) तयार होते आहे, हे लक्षात घायला हवे.

तगडे कथानक असेल तर चित्रपट उत्तम चालतो हे केवळ मुंबई- पुण्यात नव्हे तर सातारा सांगली, कोल्हापूर नाशिक या शहरात मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसते आहे. तसे झाले तर दर्जेदार चित्र तयार करण्यास येणारा खर्च वसूल करणे सोपे जाते. कोणत्या प्रेक्षक वर्गासाठी आपण चित्र बनवतो यावर भर देणे किती आवश्यक आहे हेही यातून दिसले .

मराठी चित्रपटाना महाराष्ट्र सरकारकडून अर्थसाह्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी पुस्ती त्याने जोडली. फ्लाम्बोज टाव्हर्नच्या मालक अनिता लाझार यांनी कॉर्पोरेट क्षेत्राची गरज लक्षात घेऊन नवे हॉटेल सुरु केले असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्राहकांना दर शुक्रवारी खाद्य पदार्थावर 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.