आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If You Vote Then You Can Avail Petrol At Cheap Rate

दिल्लीकरांसाठी खुशखबर; मतदानाच्या दिवशी मतदारांना मिळणार स्वस्त पेट्रोल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाच्या राजधानीत 10 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. विशेेष म्हणजे या दिवशी मतदानाचा हक्क बजावणार्‍या मतदारांना स्वस्त पेट्रोल मिळणार आहे. पेट्रोल प्रत‍िलिटर 50 पैशांनी स्वस्त उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिल्ली-एनसीआरमध्ये जवळपास 67 पंपांनी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मतदान केल्याचा पुरावा म्हणून बोटावरील शाई दाखवावी लागणार आहे. जनतेने मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजवावा, या पाश्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते. 10 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच ही ऑफर लागू राहणार आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये जवळपास 400 पेट्रोल पंप आहेत. यापैकी केवळ 67 पंपांवर मतदारांना स्वस्त पेट्रोल दिले जाईल. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स के महासचिव अजय बंसल म्हणाले, मतदारांमध्ये जनजागृतीसाठी शहरात पोस्टर कॅंपेन राबविले जात आहे. ऑटोमोबाइल मालक आणि चालकांनाही याबाबत माहिती दिली जात आहे.