आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If You Want To Be An Entrepreneur, Then Must Watch These 5 Films

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काय? तुम्हाला उद्योजक बनायचे आहे... तर नक्की पाहा हे 5 चित्रपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक यशस्वी उद्योजक बनणे सोपे नाही. यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका उद्योजकासाठी सर्वात महत्त्वाची गरज असते ते म्हणजे 'प्रेरणा' (मोटीव्हेशन) ची. चला तर आम्ही तुम्हाला सांगू प्रेरणा मिळवण्याचा एक असा मार्ग, ज्यामुळे तुम्हाला प्रेरणातर मिळेलच, त्याच बरोबर तुमचे मनोरंजनही होईल.

आम्ही इथे तुम्हाल सांगणार आहोत 5 अशा चित्रपटांबाबत, ज्यामुळे तुम्हाला उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळेल. हे असे चित्रपट आहेत, जे प्रत्येक उद्योजक बनण्याची स्वप्न बाळगणार्‍या व्यक्तीने पाहायला हवेच.
पाहूयात तरी हे चित्रपट कोणते आहेत?

1) द सोशल नेटवर्क (The Social Network)
2010 मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला तर जमावलाच, त्याच बरोबर या चित्रपटाची खुप चर्चाही झाली. या चित्रपट फेसबुकचे निर्माता मार्क झुकरबर्ग यांच्या जीवनावर असल्याचे सांगण्यात येते. आज सोशल नेटवर्कींग वापरणार्‍या प्रत्येकाला फेसबुकच्या जन्माबद्दल जाणून घेण्याची प्रचंड इच्छा आहे. या चित्रपटामध्ये फेसबुकच्या निर्माणाचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.
का पाहावा हा चित्रपट?
या चित्रपटामध्ये एखादा नवीन उद्योग कसा सुरू करावा या बद्दल अत्यंच चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहे. यामध्ये फेसबुकच्या जन्माची कथा सांगण्यात आली आहे. हा चित्रपट पाहताना आपणही असेच काहीतरी सुरू करावे अशी प्रेरणा मिळते.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या इतर 4 चित्रपटांबाबत...