आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांची तातडीची निकड भागवते टॉप-अप लोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी विनिता मिस्त्री यांनी बँकेकडून होम लोन घेऊन एका सोसायटीमध्ये सोयीनुसार अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केला. त्यांना त्यांचे दुचाकी वाहन जिन्याजवळ लावावे लागत होते. दरम्यान, विनिता यांचे उत्पन्न वाढले. त्यांनी एक छोटी कार खरेदी केली. आता त्यांना पार्किंगसाठी जागा घेण्याची गरज भासू लागली. त्यासाठी त्यांना कर्ज हवे होते.

विनिता यांच्याप्रमाणेच आपणासही पार्किंग स्लॉट खरेदी करायचा आहे किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची निकड आहे. ही निकड भागवण्यासाठी स्वस्त कर्ज हवे असल्यास चालू गृह कर्जावर टॉप-अप लोन घेणे हा चांगला पर्याय आहे. मात्र, टॉप-अप लोन घेण्यापूर्वी त्यातील बारकावे माहिती असणे आवश्यक आहे..
* काय आहे टॉप-अप लोन : बँकेकडून देण्यात आलेल्या व चालू स्थितीतील गृह कर्जावर देण्यात येणारे हे अतिरिक्त स्वरूपाचे कर्ज होय. बहुतेक बँका टॉप-अप लोन 10 वर्षे अवधीसाठी देतात. होम लोननंतर काही वर्षांनी टॉप-अप कर्ज मिळते. यातून बँकेला कर्जदाराची कर्जफेड करण्याच्या रेकॉर्डची माहिती मिळते. कर्जदाराला अतिरिक्त कर्ज दिल्यास ते थकीत होणार नाही याची हमी बँकेला मिळते. टॉप-अप लोन हे कर्जदाराची परतफेडीची क्षमता वाढल्याचे लक्षण मानले जाते.
* पात्रता : टॉप-अप लोन मिळू शकणारे गृह कर्ज घेतलेले असावे. बँकेनुसार या कर्जाच्या अटी व नियम वेगवेगळे असू शकतात.
* कोठून घ्याल : ज्या बँकेकडून आपण गृह कर्ज घेतले आहे, त्या बँकेशी संपर्क साधावा. तेथे तसा पर्याय नसेल तर जी बँक गृह कर्जावर टॉप-अप देईल अशा बँकेत आपले गृह कर्ज शिफ्ट करावे. मात्र,
यासाठी आपण गृह कर्जाची परतफेड योग्य रीतीने केलेली असावी. आपले रिपेमेंट रेकॉर्ड चांगले असावे.
* व्याजदर : टॉप-अप लोन पर्सनल लोनप्रमाणेच आहे. याचे व्याजदर होमलोनपेक्षा जास्त आणि पर्सनल लोनपेक्षा कमी असतात. व्याजदर कर्जाच्या विविध टप्प्यांनुसार ठरतात. 30 लाख रुपयांपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या कर्जासाठी हे व्याजदर 10 ते 12 टक्के असतात.
* किती मिळू शकते कर्ज : आपल्या गृह कर्जाची रक्कम, घराची सध्याची किंमत आणि टॉप-अप फेडण्याची क्षमता यावर टॉप-अपची रक्कम अवलंबून असते. आपले गृह कर्ज आणि टॉप-अप कर्जाची रक्कम आपल्या घराच्या सध्याच्या किमतीच्या 70 टक्क्यांहून जास्त नसेल, याचे भान बँका ठेवतात. तसेच बँकेच्या धोरणावरही बरेच काही अवलंबून असते.
* केव्हा घेऊ शकता : होम लोनची परतफेड सुरू झाल्यानंतर एक ते दोन वर्षांनंतर टॉप-अप मिळू शकते. काही बँका यासाठी जास्त कालावधी घेतात.
* कर सवलत : हे कर्जाच्या उद्देशावर अवलंबून असते. विनिताच्या उदाहरणात टॉप-अप लोन पार्किंग स्पेसशी संबंधित आहे, जे घराच्या खरेदीचा एक भाग आहे. त्यांना टॉप-अप कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजावर कर सवलत मिळू शकते. यासाठी अनुक्रमे एक लाख आणि दीड लाख रुपयांची मर्यादा आहे. ही रक्कम चालू गृह कर्जासाठी मिळणा-या कर सवलतीत समाविष्ट असते.
टॉप-अप लोन घेताना परतफेडीच्या कामगिरीशिवाय बँका उत्पन्न किती आहे हेही पाहतात. तसेच चालू गृह कर्जाशिवाय आपण
आणखी किती कर्ज घेतले आहे, हेही बँका तपासतात. त्यानंतरच टॉप-अपची रक्कम निश्चित केली जाते.


लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com