आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परकीय गुंतवणुकीवरील अवलंबित्वाचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1६ ऑगस्ट 2013 रोजी भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक हा ७६९ अंकांनी खाली आला. तसेच 10 वर्षांतील बाँड यील्ड ८.८% पर्यंत गेली. रुपयादेखील घसरला. असे का झाले ?
याचे एक कारण म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेमधील बेरोजगारी कमी होतेय अशी माहिती आली. क्वांटिटेटिव्ह इएसिंग (Quantitative easing) या कार्यक्रमाद्वारे जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेमध्ये पैसे टाकले जातात. ते नजीकच्याच काळात कमी केले जाणार अशा बातमीने यूएस, यूके, जर्मनी मधील बाँड्सच्या किमती कमी झाल्या व याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला.
भारतीय शेअर बाजारातील इक्विटी व डेट दोन्ही मार्केट्स घसरले. इतर विकसनशील अर्थव्यवस्थांवरसुद्धा असाच परिणाम दिसून आला. परंतु भारतीय अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकीवर जास्त प्रमाणात अवलंबून असल्याने कदाचित इतर देशांपेक्षा आपल्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम हा मोठ्या स्वरूपाचा होता. जग हे खेडे होत चालले आहे याचा हा एक पुरावाच म्हणता येईल.
गुरुवारी अमेरिकेचा जॉबलेस क्लेम डाटा जाहीर झाला. त्यावरून असे लक्षात आले की अमेरिकेत बेरोजगारी कमी होत चालली आहे . बेरोजगारीचा दर हा ७.4% पर्यंत खाली आलेला दिसून आला. याचा अर्थ असा की, अमेरिकेची अर्थव्यवस्था कदाचित अपेक्षेपेक्षा अधिक गतीने सुधारतीये. यूएस फेडरेशनने त्यांच्या मागील पॉलिसीमध्ये असे म्हटले होते की, बेरोजगारीचा दर (रेट) जर ७% पेक्षा खाली गेला व इतर काही घटक अनुकूल झाले तर दए कार्यक्रमाद्वारे अर्थव्यवस्थेला केली जाणारी मदत कमी करण्यात येईल.
ही मदत सप्टेंबर 2013 मध्येच कमी करण्यात येणार अशी बातमी पसरली व डॉलर मजबूत झाला. रुपया घसरला. इथेही आपण एफआयआयवर जास्त अवलंबून असल्याने इतर चलनांपेक्षा रुपया जास्त घसरला. अर्थातच याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला व शेअर बाजार ७६९ अंकांनी खाली आला.
इथे हे लक्षात घेतले पाहिजे की एफआयआयने मागील काही महिन्यांमध्ये ८ ते 10 बिलियन यूएस डॉलर
इतकी रक्कम काढून घेतली आहे. मागील 3 वर्षांमध्ये जीडीपीमधील वाढ कमी होते आहे, करंट अकाउंट डेफिसिट, फिस्कल डेफिसिट वाढत चालला आहे. रुपया घसरतोय आणि महागाई निर्देशांक वर चाललाय. राजकीय अनिश्चितता आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये जर दए द्वारे दिली जाणारी मदत कमी झाली तर परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर विक्री करू शकतात. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणा-यांसाठी ही मोठी संधी आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूक कमी करण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे सोन्याचे दर खाली आले की आपण सोने विकत घेतो , त्याप्रमाणेच ही वेळ अधिक गुंतवणूक करण्याची आहे.


abolianand@gmail.com