आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाचे अवमुल्यन सुरुच, काय होईल तुमच्यावर परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत आहेत, तर संसदेत वातावरण तापलेले आहे. संसदेत विरोधीपक्षाने कोळसा घोटाळ्याशी संबंधीत फाइल गहाळ झाल्याच्या प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर दिवसेंदिवस महाग होत आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 65 वर गेली आहे. अशाच पद्धतीने बुधवारीही रुपयाची विक्रमी घसरण झाली होती. गुरुवारी बाजाराला सुरुवात झाली तेव्हा एका डॉलरची किंमत 64.90 रुपये होती. पुढच्या काही क्षणातच ती 65.12 रुपयांवर गेली. बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा 64.11 वर होता. दरम्यान, सध्या रुपयाची किंमत 64.38 आहे. कालप्रमाणेच आजही रुपयाचे अवमुल्यन सुरुच आहे.