आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव नाही - वित्त मंत्रालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चालू खात्यातील तुटीची परिस्थिती लक्षात घेता सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करण्यात आलेला नसल्याचे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चालू खात्यातील तुटीवर होणारा परिणाम लक्षात घेता सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे वित्त राज्यमंत्री जे. डी. सलीम यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.
चालू खात्यातील तुटीचा रुपयाच्या मूल्यावर झालेला परिणाम लक्षात घेऊन सरकारने गेल्या वर्षात सोन्यावरील आयात शुल्कात तीन वेळा वाढ करून ते 10 टक्क्यांवर नेले. रिझर्व्ह बॅँकेनेदेखील सोने आयातीला निर्बंध घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या.