आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात शुल्कात वाढल्याने सोने महागले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारने सोमवारी सोने व प्लॅटिनमवरील आयात शुल्क 4 टक्क्यांवरून 6 टक्के केले आहे. यामुळे सोने प्रतितोळा 700 रुपयांपर्यंत महागण्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला. दरम्यान, औरंगाबादेत सोमवारी सोने 250 रुपयांनी महागून 31,400 वर पोहोचले.

अर्थमंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी विभागाचे सचिव अरविंद मायाराम यांनी आयात शुल्कवाढीची घोषणा केली. सरकार गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडला (ईटीएफ) सुवर्ण जमा योजनेशी जोडणार आहे. यामुळे म्युच्युअल फंडांना आपल्याकडे जमा असलेले सोने विकण्याची मुभा मिळेल. बँकांच्या सोन्याशी निगडित योजनांतही गुंतवणुकीची संधी यामुळे मिळणार आहे.सर्वसामान्यांनी आपल्याकडे सोने बँकांत जमा करण्यास आकर्षित व्हावे, हा या मागचा उद्देश आहे.
शुल्कवाढीचे कारण काय
*वित्तीय तूट नियंत्रणात आणण्यासाठी सरकारची ही उपाययोजना.
*वित्त वर्ष 2011-12 मध्ये देशात 56.5 अब्ज डॉलर्स सोन्याची आयात झाली होती.
*चालू वित्त वर्षात आतापर्यंत 38 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सोन्याची आयात झाली आहे.
*ही आयात 31 टक्क्यांनी घटवून 40 अब्ज डॉलर्सपर्यंत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट.