आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात वस्तूंच्या निर्यात नियमात बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ढासळत्या निर्यातीला वेग येण्यासाठी सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ज्या आयात केलेल्या वस्तूंची 15 टक्के मूल्यवृद्धी झाली आहे अशा वस्तूंच्या निर्यातीला सरकारने परवानगी दिली आहे. ज्या देशाकडून निर्यातीचे मूल्य रुपयांत अदा केले जाते अशा देशांत या वस्तूंची निर्यात करता येणार आहे.

नव्या बदलामुळे ज्या देशात आयात वस्तूंची निर्यात करता येईल अशा देशांची यादी विदेश व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) वेळोवेळी अधिसूचित करणार आहे. संचालनालयाच्या पत्रकानुसार आयात करण्यात आलेल्या वस्तूंच्या निर्यातीसाठी खास तरतूद करण्यात आली आहे. ज्या वस्तूंच्या आयातीसाठी मुक्तपणे परवर्तनीय चलनात वापर करण्यात आला आहे त्याच वस्तूंची निर्यात या तरतुदीअंतर्गत करता येणार आहे. जेथून एक्सपोर्टची रक्कम रुपयांत मिळेल अशा देशांत या वस्तूंची निर्यात करता येईल. आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये भारतातून होणार्‍या निर्यातीत 1.8 टक्के घसरून 300.6 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच भारतीय निर्यातीत घसरण दिसून आली. एवढेच नव्हे तर यामुळे देशाची व्यापार तूट वाढली आहे. आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये व्यापारी तूट वाढून 191 अब्ज डॉलर अशा विक्रमी स्तरावर पोहोचली आहे.