आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नैसर्गिक गॅस, काळाची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच सरकारने घरगुती नैसर्गिक गॅसचे दर वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे एप्रिल महिन्यापासून देशात उत्पादित होणार्‍या नैसर्गिक वायूचे दर दुप्पट होतील. परिणामी वीज, युरिया आणि सीएनजीच्या किमती वाढतील. भविष्यात ऊर्जेचा मुख्य स्रोत नैसर्गिक वायू हाच राहील, असे जाणकारांचे मत आहे.

नैसर्गिक वायू हा जीवाश्म इंधनाचा एक प्रकार आहे. लाखो वर्षांपूर्वी जमिनीत गाडले गेलेल्या पशुपक्षी, झाडेझुडपे आणि सूक्ष्म जीवांपासून हा तयार झालेला असतो. मेलेली जनावरे, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचे विघटन होते आणि ते जमिनीत दबून राहतात. लाखो वर्षे जमिनीत दबले गेलेल्या या वस्तूंचे सैंद्रिय घटक वेगळे होतात. वाढते तापमान आणि दाबामुळे सेंद्रिय घटकांमधील कार्बन संयुगाचे विघटन होऊ लागते. या मॉलिक्युलर ब्रेकडाऊनमुळे थर्मोजेनिक मिथेनची निर्मिती होते. ज्याला नैसर्गिक वायू म्हणतात. भूगर्भातील दाब आणि तापमानामुळे काही घटकांचे कोळसा, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूमध्ये रूपांतर होते. नैसर्गिक वायू हा कायम कच्च्या तेलाच्या परिसरात आढळतो. नैसर्गिक वायू हा रंगहीन, गंधविरहित पर्यावरणपूरक ऊर्जेचा स्रोत आहे. यात 95 टक्के हायड्रोकार्बन असून ज्यात 80 टक्के मिथेन असते. जगात नैसर्गिक वायूची वाढती मागणी पाहता अतिरिक्त उत्पादनासाठी डायजेस्टर नावाच्या मशीनचा वापर केला जात आहे. या मशीनच्या मदतीने जीवजंतू आणि वनस्पतींच्या कचर्‍याला नैसर्गिक वायूमध्ये बदलता येते. या मशीनच्या मदतीने सेंद्रिय घटकांचे विघटन करण्यासाठी लागणारा लाखो वर्षांचा कालावधी कमी करता येतो. सध्या वाढते प्रदूषण आणि ऊर्जेच्या तुटवड्यामुळे नैसर्गिक वायूची गरज वाढत चालली आहे. अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र याचा उपयोग स्वयंपाक घरापासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत सर्वत्र करत आहेत. अमेरिकेच्या एकूण ऊर्जा गरजेपैकी 24 टक्के गरज हा वायू पूर्ण करतो. भारतात नैसर्गिक वायूचा सीएनजी, एलपीजी, वीज आणि पेट्रोकेमिकल उद्योगात जास्त प्रमाणात केला जातो.