आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूकदारांनी महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


2012 हे वर्ष इक्विटींचे वर्ष ठरले. वर्षाच्या सुरुवातीला जरी ते अपेक्षित नव्हते तरीही. ज्या गुंतवणूकदारांनी इक्विटींवर विश्वास ठेवला ते वर्षाच्या शेवटी खुश झाले आणि जे बाजार आणखी खाली जाईल म्हणून वाट पाहत थांबले होते ते संधी हुकली म्हणून हळहळत राहिले. शेअर बाजार आपली चांगली कामगिरी पुढे सुरू ठेवील अशी चिन्हे दिसत आहेत. यूएस काँग्रेसने ‘क्लिफ क्लिफ’ बिल पास केल्यानंतर निफ्टीने दोन वर्षांमध्ये प्रथमच 6000 चा टप्पा ओलांडला. आरबीआयच्या पतधोरणाने, केंद्रीय अर्थसंकल्पाने बाजारात आणखी जान आणली.

रिटेल गुंतवणूकदारांनी निर्णय घेताना काळजी घ्यायला हवी: आपण मागे राहिलो, अशी भावना गुंतवणूकदारांमध्ये नक्कीच आहे आणि त्यातली काही मंडळी कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर या लाटेवर स्वार होण्याची शक्यता आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांची प्रवृत्ती सेक्टर, थीमॅटिक आणि मिड-कॅप अशा फंडांमध्ये गुंतवणूक करून हुकलेल्या संधीची भरपाई करण्यास आक्रमक होण्याची असते. म्हणून रिटेल गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे निर्णय घेताना काळजी घ्यायला हवी. सध्याच्या पातळीत गुंतवणूक विविध विस्तारित फंडांमध्ये करण्याची आणि फक्त दीर्घकालीन मुदतीसाठी करण्याची खबरदारी त्यांनी घ्यावी हे बरे. असे दिसून येते की, बाजार चढा असल्यावर भीती आणि लोभ अशा संमिश्र भावना गुंतवणूकदारांच्या मनामध्ये येऊ लागतात. काही जण इक्विटींमध्ये आक्रमक गुंतवणूक करतात, तर काही जण घाबरून घाईघाईने बाहेर पडतात. परिणामी ते एकतर त्यांच्या गुंतवणुकीचा काही भाग गमावून बसतात किंवा ते कधी बाहेर पडतात त्यानुसार काही प्रमाणात फायदा गमावतात.

जोखीम आणि फायदा याचे संतुलन राखणे हे यशाचे रहस्य:
इतकेच नाही तर जे या चढ्या बाजारात आपली गुंतवणूक कायम ठेवतात त्यांनाही काही प्रश्न भेडसावू शकतात. उदाहरणार्थ, त्यांच्या निवेशसंचातील काही फंड एकंदर बाजाराच्या वेगाने न धावणारे असू शकतात. त्यामुळे अशा फंडांबाबत एकाएकी काही निर्णय घेण्याचा मोह त्यांना होऊ शकतो. त्यांनी हे ध्यानात ठेवायला हवे, की एमएफ्स अनेक प्रकारचे फंड देऊ करतात आणि यापैकी प्रत्येकाची बाजाराच्या विभिन्न प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात गुंतवणूक असते. म्हणून एखाद्या फंडाची कामगिरी मोजण्याची योग्य पद्धत म्हणजे त्याची तुलना बेंचमार्कशी करणे तसेच तशाच प्रकारच्या अन्य फंडांशी म्हणजे पीअर ग्रुपच्या कामगिरीशी करणे होय. फंडांनी अवलंबलेले धोरण/ तत्त्वज्ञानही ते विभिन्न बाजारस्थितींमध्ये कसा पवित्रा घेतात यावर प्रभाव पाडत असते. सध्याप्रमाणे बाजारस्थिती असल्यास सेक्टर, थीमॅटिक आणि मिड-कॅप फंडांची चांगली कामगिरी करण्याकडे प्रवृत्ती असली तरी ते खूप जोखमीचेही ठरू शकतात. याउलट लार्ज कॅप आणि लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करणारे विविध विस्तारित फंड मंदावण्याकडे प्रवृत्ती असते.

अल्पकाळात अधिक जास्त वृद्धी साधण्याच्या मोहात पडून गुंतवणूकदारांनी निवेशसंचामध्ये फार मोठे बदल करू नयेत. जोखीम आणि फायदा यामध्ये संतुलन राखणे हे यशाचे रहस्य आहे. योग्य फंडांची निवड करण्यासाठी जी गुंतवणूक कौशल्ये आणि माहिती आवश्यक : या सा-या प्रकारात गुंतवणूकदारांनी हेही ठरवायला हवे की, त्यांना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्यावसायिक मदत हवी आहे की नको. 1 जानेवारी 2013पासून म्युच्युअल फंडांनी थेट म्हणजे वितरकांच्या माध्यमातून न येणा-या गुंतवणुकींसाठी विद्यमान तसेच नव्या योजनांमध्ये एक स्वतंत्र प्लॅन देण्यास सुरुवात केली आहे. या थेट प्लॅन्समध्ये वितरण खर्च, कमिशन वगैरे नसल्याने खर्चाचे गुणोत्तर प्रमाण कमी असेल आणि या प्लॅन्समधून कसलेही कमिशन दिले जाणार नाही. त्यानुसार या प्लॅन्सच्या एनएव्हीज वेगळ्या असतील.


जरी नियामकांनी उचललेली ही पावले गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहेत असे वाटत असले तरी आपला कष्टाने कमावलेला पैसा स्वत:च हाताळताना त्यांना कसे वाटते हे पाहायला हवे. जरी म्युच्युअल फंड ही गुंतवणुकीची एक सोपी पद्धत असली तरी त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणे कठीण वाटू शकते. कारण निवड करण्यासाठी शेकडो फंड आहेत. योग्य फंडांची निवड करण्यासाठी जी गुंतवणूक कौशल्ये आणि माहिती आवश्यक आहे तिचा आवाका पाहता छाती दडपून जाऊ शकते. हे ध्यानात असू द्या,की व्यावसायिक सल्लागार तुमच्या निवेशसंचाच्या यशामध्ये अनेक प्रकारे फरक पाडू शकतो.


पहिले म्हणजे, व्यावसायिक सल्लागार तुमच्या गुंतवणूक प्रक्रियेतून भावनेला हद्दपार करून तुम्हाला योग्य मार्गावर राहण्यास मदत करू शकतो. दुसरे म्हणजे, तो तुम्हाला तुमची गुंतवणूक उद्दिष्टे, गुंतवणूक मुदत आणि जोखीम रूपरेषा यांच्याशी सुसंगत असे एखादे मालमत्ता धोरण विकसित करण्यास मदत करू शकतो. शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एखादा व्यावसायिक आपल्या गुंतवणुकींचे व्यवस्थापन करत आहे अशी जाणीव असल्यावर तुम्ही आपल्या स्वत:च्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता. अर्थात आपल्यासाठी असा एखादा सल्लागार निवडताना आपण काळजी घ्यायला हवी, हे वेगळे सांगायला नकोच. लक्षात असू द्या, ज्या सल्लागाराकडे तुम्हाला नको त्या जोखमीत न ढकलता तुमचे उत्पन्न यथायोग्य पातळीत आणण्याची तज्ञता आणि स्रोत आहेत त्याच्यासाठी पैसे खर्च करणे फायदेशीर ठरते.
(सीईओ वाइज इन्व्हेस्ट अ‍ॅडवायझर्स प्रा. लि.)


hrustagi@yahoo.com