आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलरचे असे नेमके काय महत्त्व आहे की, तो आपल्या रुपयापेक्षा जास्त चर्चेत आहे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल सगळ्यांच्या नजरा एका बातमीकडे लागलेल्या असतात. ती बातमी म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया किती घसरला की वधारला. डॉलरचे असे नेमके काय महत्त्व आहे की तो आपल्या रुपयापेक्षा जास्त चर्चेचा झाला आहे.

जगात सर्वात जास्त दबदबा असलेले चलन म्हणजे डॉलर. जागतिक चलन म्हणून डॉलरचा लौकिक कायम आहे. एखाद्या देशातून आयात करावयाची असल्यास त्याचा मोबदला डॉलरमध्ये द्यावा लागतो. परिणामी आपण जेवढी जास्त आयात करतो तेवढय़ा जास्त प्रमाणात आपल्याला डॉलरची गरज भासते. ही स्थिती जगातील जवळपास सर्वच देशांची आहे. आयातीच्या तुलनेत निर्यात योग्य प्रमाणात होत असल्यास आणि विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक होत राहिल्यास कधीही डॉलरचा तुटवडा निर्माण होत नाही.

- डॉ. नितीन तांतेड
फायनान्शियल एज्युकेशन रिसोर्स पर्सन, सेबी
(हा लेख यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे)

पूर्वी काय होते? वाचा पुढील स्लाईड्‍सवर....