आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट कार्डद्वारे सुधारा क्रेडिट स्कोअर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्ड क्रेडिट स्कोअर सुधारण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. जर सतर्कता बाळगली नाही तर स्कोअर जमिनीवरही आणू शकते. विचारपूर्वक क्रेडिट कार्डचा वापर करण्यातच हुशारी आहे. क्रेडिट कार्डद्वारे स्कोअर कसा वाढवायचा याबाबत...

* कर्ज नसेल तरच घ्या क्रेडिट कार्ड : जर आतापर्यंत कसलेही कर्ज डोक्यावर नसेल तर प्रतिष्ठित तसेच लाकप्रिय ब्रँडचे क्रेडिट कार्ड घ्या. याच्या विचारपूर्वक वापराने क्रेडिट स्कोअर वाढवण्यास मदत मिळेल.
* जास्त क्रेडिट लिमिट असणारे कार्ड घ्या : जी कंपनी/बँक जास्त क्रेडिट लिमिट देईल ते कार्ड घ्या. त्याचा वापर नसेलही; मात्र त्यामुळे क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत होईल.
* जुने कार्ड बंद करू नका : क्रेडिट कार्ड अकाउंट काही वर्षे सुरू राहिल्याने क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदतच होते. एकापेक्षा अधिक कार्ड असतील तर सर्वात जुने कार्ड सुरूच ठेवा. अलीकडे खरेदी केलेले कार्ड बंद करा.
* अनेक कार्ड असतील आलटून-पालटून वापर करा : खरेदीसाठी एकाच कार्डचा वापर न करता सर्व कार्डांचा आलटून-पालटून वापर करा. सहा महिन्यांत एकदा प्रत्येक कार्डचा वापर होईल अशा पद्धतीने वापर करा. कार्डचा वापर न झाल्यास अनेक बँका अकाउंट बंद करू शकतात. अशा वापरामुळे क्रेडिट स्कोअरवर विपरीत परिणाम होत नाही.
* व्याजदर कमी करण्यासाठी चर्चा करा : कार्डचे रिपेमेंट बिनचूक ठेवा. त्यामुळे रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्डचा लाभ मिळू शकतो. व्याजदर कमी करण्यासाठी बँक अधिका-यांशी चर्चा करा. समाधान झाल्यास बँका व्याजदर कमी करू शकतात.
* क्रेडिट लिमिट वाढवण्याची विनंती करा : जास्त क्रेडिट लिमिटसाठी कार्ड घेतले असल्यास आणि जुने काही कार्ड बंद करण्याची इच्छा आहे. मात्र, अलीकडेच खरेदी केलेले कार्ड बंद करून काहीच फायदा होत नाही हे माहिती असल्यास आणि आपले रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड चांगले असल्यास आपल्या जुन्या बँकेला क्रेडिट कार्डवरील लिमिट वाढवण्याची विनंती करा. बहुतांश बँका अशी विनंती मान्य करतात.
* स्वत:ची क्रेडिट लिमिट तयार करा : जर क्रेडिट कार्ड लिमिटचा 40 टक्क्यांहून अधिक वापर करत नसल्यास आपल्या क्रेडिट स्कोअरवर चांगला परिणाम होतो. क्रेडिट लिमिट जास्त असूनही त्याचा वापर केला नाही, हे आपली आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे निदर्शक आहे. अशा स्थितीत एकापेक्षा अधिक कार्ड असली तरी ते सुरु ठेवणे हिताचे. यामुळे एकूण क्रेडिट लिमिट वाढून आपला क्रेडिट स्कोअर वाढण्यास मदत होईल.
* क्रेडिट कार्डची बाकी लवकर फेडा : यामुळे क्रेडिट कार्ड स्कोअर सुधारण्यास मदत होते. एकापेक्षा अधिक कार्ड असतील तर त्याचा आलटून-पालटून वापर करा आणि वेळेवर भरणा करत राहा.

लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com