आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीतही कार विक्री जोरात चालू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन बाजारात मंदीचे वारे वाहत असतानाही मारुती सुझुकी, होंडा आणि ह्युंदाई मोटर या कंपन्यांना मात्र विक्रीचा टॉप गिअर टाकता आला आहे; परंतु महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा आणि टाटा मोटर्स यांच्या विक्रीची गाडी मात्र घसरली आहे.


एकीकडे मोटारींच्या विक्रीचा आलेख घसरता असला तरी हीरो मोटोकॉर्प, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स या कंपन्यांनी मात्र ऑगस्ट महिन्यात चांगल्या विक्रीची नोंद केली आहे. एम 800, ए स्टार , वॅगन आर : 31,019 वाढ : 45.1 % स्विफ्ट, इस्टिलो, रिट्झ : 17,409 डिझायरच्या विक्रीत चारपटीने वाढ : 3,805 मोटारींवरून 13,723 मोटारींवर होंडा कार्स इंडिया लिमिटेड अमेझ या बाजारात आलेल्या सेडान मोटारीच्या बळावर कंपनीच्या स्थानिक बाजारपेठेतील विक्रीत 63 टक्क्यांनी वाढ होऊन ती 6,242 मोटारींवरून 8,913 मोटारींवर गेली आहे.
फोर्ड इंडिया : या कंपनीलादेखील बाजारात नव्या आलेल्या इकोस्पार्ट एसयूव्हीने मदतीचा हात दिला आहे. कंपनीची विक्री गेल्या वर्षातल्या 7,840 मोटारींवरून 8008 मोटारींवर गेली आहे.


ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड : ह्युंदाईच्या मोटार विक्रीमध्येदेखील चांगली वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या ऑगस्ट महिन्यातील 28,257 मोटारींवरून 28,311 मोटारींवर गेली आहे.


मारुती सुझुकी
मानेसर प्रकल्पात महिनाभरापासून टाळेबंदी सुरू असतानाही कंपनीला ‘बेस इफेक्ट’चा फायदा होऊन कंपनीच्या विक्रीत 51.6 टक्के वाढ झाली आहे. 2012 ऑगस्ट मध्ये 50,129 मोटारींच्या तुलनेत कंपनीने यंदाच्या ऑगस्टमध्ये 76,018 मोटारींची विक्री केली आहे.


अन्य कंपन्यांना झळ
काही निवडक मोटार कंपन्यांनी विक्रीत चांगली कामगिरी केलेली असली तरी ग्राहकांची मरगळलेली मानसिकता, इंधनाचे वाढलेले दर आणि अर्थव्यवस्थेतील एकूणच मरगळ यामुळे अन्य मोटार कंपन्यांना विक्री वाढवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.


टाटा मोटर्स
टाटा मोटर्सच्या विक्रीमध्ये 48.16 टक्क्यांनी घट होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या 22,311 मोटारींवरून 11,564 मोटारींवर आली आहे.


अन्य मोटार कंपन्यांच्या विक्रीचा कल असा
कंपनी ऑग.12 ऑग.13 वाढ/घट
टोयोटा किर्लोस्कर 13,995 12,007 - 14.2 %
महिंद्रा अँड महिंद्रा 42,826 35,159 - 17.9 %
फोक्सवॅगन 4,410 4,805 9 %
जनरल मोटर्स 7,510 6,673 - 11.14%


दुचाकी कंपन्यांची कामगिरी
हीरो मोटोकॉर्प 4,59,996 + 3.36 %
बजाज ऑटो 2,78,583 + 8.46 %
यामाहा मोटर इंडिया 60,996 + 67.4 %
होंडा मोटारसायकल 3,08,932 +38.77 %
टीव्हीएस मोटर कंपनी 1,55,532 +0.52 %