आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्टफोनच्या जगात : अँड्रॉइडऐवजी टायझन वापरणार सॅमसंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्मार्टफोनच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सॅमसंगने गुगलच्या अँड्रॉइड कार्य प्रणालीचा (ऑपरेटिंग सिस्टिम-ओएस) चपखल वापर केला. सॅमसंगला त्याचा चांगला फायदाही झाला. त्यामुळेच सॅमसंगचे 96 टक्के स्मार्टफोन अँड्रॉइडवर आधारित आहेत. मात्र, सध्या अँड्रॉइडचा वापर करणा-या कंपन्याची बाजारात गर्दी झाली आहे. त्यामुळेच मोबाइल बाजारातील आपली आघाडी कायम राखण्यासाटी सॅमसंगने ओएस बदलण्याची तयारी सुरू केली आहे.

सॅमसंग आता इंटेल आधारित ओपन सोर्सच्या टायझन या ऑपरेटिंग सिस्टिमचा सहारा घेणार आहे. सॅमसंग टायझन या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित एक स्मार्टफोन लवकरच बाजारात आणणार आहे. यामुळे अँड्रॉइडवर विसंबून असणा-या अ‍ॅपलसह गुगलसमोर तगडे आव्हान आहे. हाय एंड श्रेणीतील महागड्या स्मार्टफोनबाबत ग्राहकांचा कल अ‍ॅपलकडून सॅमसंगकडे वळला आहे.


अँड्रॉइड ओएसला पर्याय आणणे सोपे नव्हे
अ‍ॅँड्रॉइडची लोकप्रियतेमुळे आता आयओएसदेखील मागे पडली आहे. अशा स्थितीत अँड्रॉइडला पर्याय आणणे सॅमसंगला तेवढे सोपे नसल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. आयओएसच्या तुलनेत अँड्रॉइड ही अधिक लवचीक कार्य प्रणाली आहे. अँड्रॉइडमुळे फोनला गरजेनुसार कस्टमाइज करता येते. आयओएसच्या तुलनेत अँड्राइड अधिक देखणे आहे. गुगलतर्फे अँड्रॉइड 4.0 साठी वापरण्यात आलेली आइस्क्रीम सँडविचची डिझाइन लँग्वेज स्पष्ट आणि संवेदनशील आहे.
या तुलनेत आयओएस अत्यंत रुक्ष पद्धतीने कार्य करते, असे तज्ज्ञांचे मत आहे.


सॅमसंगची तयारी
* टायझन ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोन बाजारात आणण्याची सॅमसंगची तयारी
* ऑगस्टमध्ये हा स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी सॅमसंगच्या हालचाली.