आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय अर्थसंकल्पात निर्यातदारांना बसणार झटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आधीच अनेक अडचणीच्या गुंत्यात अडकलेल्या निर्यातदारांना केंद्रीय अर्थसंकल्पात झटका बसण्याची शक्यता आहे. आर्थिक चणचणीमुळे विविध योजनांतर्गत निर्यातदारांना मिळणा-या आर्थिक सवलतीत सरकार कपात करण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून निर्यातदारांना तसे संकेत मिळाले आहेत. अशा कपातीमुळे मार्केटिंगच्या धोरणावर परिणाम होण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली. निर्यातदारांना मार्केट डेव्हलपमेंट असिस्टन्स (एमडीए) व मार्केट असिस्टन्स इन्सेंटिव्ह (एमएआय) या योजनांतून प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळते. यंदा या दोन्ही योजनांतून 200 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही योजनांतील रकमेत 10 ते 15 टक्के कपातीची शक्यता आहे. सर्व क्षेत्रांतील निर्यातदार आणि वाणिज्य मंत्रालय यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत मंत्रालयाने तसे संकेत दिले. ही कपात लक्षात घेता आगामी आर्थिक वर्षात या दोन्ही योजनांकडून कसलीच अपेक्षा उरली नसल्याचे मत निर्यातदारांनी व्यक्त केले. आता निर्यात करताना अत्यंत सतर्कता व सावधानता बाळगावी लागेल, असेही काही निर्यातदारांनी म्हटले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (फिओ) अध्यक्ष रफिक अहमद यांनी सांगितले, देशातून सुमारे 300 अब्ज डॉलरहून अधिक निर्यात होते.

कपात किती
* या दोन्ही योजनांतील रकमेत 10 ते 15 टक्के कपातीची शक्यता आहे.
* मार्केटिंगसाठी मदत न मिळाल्यामुळे निर्यातीवर परिणामाची शक्यता आहे.
मदत कोणासाठी
* निर्यातदारांना मार्केट डेव्हलपमेंट असिस्टन्स (एमडीए) व मार्केट असिस्टन्स इन्सेंटिव्ह (एमएआय) या योजनांतून प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळते.