आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात उत्पन्न वाढले, गरिबी घटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वर्ष 2004-05 ते 2011-12 दरम्यान दरडोई उत्पन्नात 6.7 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आल्यामुळे देशातील गरिबीचे प्रमाण वार्षिक 2.2 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे भारतातील आर्थिक विकासाची दीर्घ वाटचाल दरडोई उत्पन्नात वाढ होऊन गरिबी कमी करण्यातही साहाय्यकारी ठरली आहे.

सूत्रांच्या मते, आर्थिक विकासासोबत रोजगारात वृद्धी झाल्यामुळे उत्पन्न आणि खर्चाच्या स्तरात वाढ होत असते. त्यामुळे देशातील गरिबीचे प्रमाणही कमी होऊन जाते. नियोजन आयोगानुसार, 2011-12 दरम्यान देशातील 21.9 टक्के लोक दारिद्रय़रेषेखाली जीवन जगत होते. या वर्षात दरडोई मासिक खर्चाच्या आधारावर दारिद्रय़रेषा अंदाजे 816 रुपये होती, तर शहरी भागात तेच प्रमाण 1 हजार रुपयांवर होते.


गरिबीत 2.2 % घट
0 2004-05 ते 2011-12 दरम्यान दरडोई उत्पन्नात 6.7 टक्क्यांची वार्षिक वृद्धी
0 गरिबीच्या प्रमाणात वार्षिक 2.2 टक्क्यांनी घट

गरिबीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी
या वर्षात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक लोक दारिद्रय़रेषेखाली उदरनिर्वाह करत होते. दुसर्‍या क्रमांकावर बिहार तर तिसर्‍या क्रमांकावर मध्य प्रदेश हे राज्य होते. महाराष्ट्राचा या यादीत चौथा क्रमांक होता.