आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Income Tax Department News In Marathi, Taxpayers To Share E mail And Phone Numbers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटी रिटर्न भरताना करदात्याला द्यावा लागेल ईमेल, मोबाईल नंबर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कर चुकवेगिरीला चाप बसवण्यासाठी प्राप्तीकर विभानाने कठोर धोरण अवलंबले आहे. आता इनकम टॅक्स रिटर्न अर्जामध्ये मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी देणे बंधनकारक असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टेक्सेसने (सीबीडीटी) रिटर्न भरण्याच्या अर्जावर एक नवा कॉलम ठेवला आहे. ज्यात करदात्यांनी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरणे बंधनकारक असल्याचे, तसे आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करदात्यासंबंधित काही माहिती देणे तसेच घेण्याबाबत रिटर्न अर्जावर मोबाईल नंबर व ईमेल आयडी असल्यास त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे जाईल. तसेच वेळेवर रिफंड सुनिश्चित करण्यासाठीही मदत होईल.

(फाइल फोटो)