आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Income Tax Department To Act Tough With Non Filers

रिटर्न भरणारे पाच लाख करदाते ‘प्राप्तिकर’च्या रडारवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही जर प्राप्तिकर रिटर्न भरला नसेल तर सावधान. कारण प्राप्तिकर विभाग लवकरच रिटर्न भरण्यास सांगणार आहे किंवा तो भरण्याबाबत चौकशी करणार आहे. जवळपास पाच लाखांहून जास्त करदात्यांनी यंदा अद्याप रिटर्न दाखल केलेले नाहीत. कर संकलन वाढवण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सर्व मुख्य प्राप्तिकर आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहून अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

सीबीडीच्या मते, ५,०९, ८९८ करदात्यांनी आर्थिक वर्ष २०११-१२,२०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये दाखल केलेल्या ई-रिटर्नमध्ये उत्पन्न १० लाखांच्या वर दर्शवले आहे सेल्फ असेसमेंट कर भरला आहे. मात्र, त्यांनी २०१४-१५ साठी प्राप्तिकर रिटर्न दाखल केलेले नाहीत. मुख्य प्राप्तिकर आयुक्तांनी अशा प्रकरणावर करडी नजर ठेवायला हवी.

कार्यवाही कशासाठी
उगम स्थानी करकपात अर्थात टीडीएस कपातीच्या माध्यमातून कमी कर पाठवणे मोठ्या रकमांचे रिफंड जारी होण्याच्या मागील वर्षाच्या प्रकाराच्या तुलनेत यंदा कर संकलनात घट आली आहे. हे लक्षात घेऊन सीबीडीटीने कर संकलन वाढवण्यासाठी शक्य ते उपाय करण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली होती. सरकारने २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ७,३६,२२१ कोटी रुपयांचे कर संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे. गतवर्षीच्या सुधारित अंदाजापेक्षा ते १५ टक्क्यांनी जास्त आहे.

जास्त कर रिफंडमुळे तुटीवर दबाव - जेटली
चालू आर्थिक वर्षात टॅक्स रिफंड वाढीचा परिणाम वत्तीय तुटीवर होणार असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. एप्रिल ते सप्टेंबर या काळात हे प्रमाण लक्ष्याच्या ८२.६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यंदा सुमारे १२० लाख कोटी रुपयांचा कर रिफंड बाकी आहे. सरकारचा खर्च उत्पन्नातील फरक वित्तीय तूट दाखवतो. सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक वर्ष २०१४-१५ साठी वित्तीय तुटीचे लक्ष्य ५.३१ लाख कोटी रुपये अर्थात जीडीपीच्या ४.१ टक्क्यांइतके िनश्चित केले आहे. मात्र, मागील सहा महिन्यांत हे ४.३८ लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे, जे लक्ष्याच्या तुलनेत ८२.६ टक्के आहे.

मुख्य प्राप्तिकर आयुक्त प्रकरणांवर लक्ष ठेवणार
५,०९, ८९८ करदात्यांनी भरलेला नाही प्राप्तिकर रिटर्न
५.३१ लाख कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीचा अंदाज आहे यंदाच्या वर्षात
७,३६,२२१ कोटी रुपये कर संकलनाचे लक्ष्य आहे २०१४-१५ साठी