आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Income Tax Limitation Become Three Lack Rupees, Law Ministry Give Green Signal

प्राप्तिकर सवलत मर्यादा होणार तीन लाख रुपये, कायदा मंत्रालयाचा हिरवा कंदील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्राप्तिकर सवलत मर्यादा वाढवून 3 लाख रुपये करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. प्रत्यक्ष कर संहितेचा (डीटीसी) हा मसुदा मंजुरीसाठी कॅबिनेटकडे व नंतर संसदेत सादर करण्यात येईल. येत्या 5 डिसेंबरला सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ते मांडण्याची अर्थखात्याची तयारी आहे.
अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, डीटीसी विधेयकावरील ताज्या मसुद्यात प्राप्तिकर सवलतीच्या मर्यादेबाबत संसदीय समितीची शिफारस जवळपास मान्य झाली आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या स्थायी समितीने प्राप्तिकर सूट मर्यादा तीन लाख करण्याचा सल्ला दिला होता. तसेच 10 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांवर 10 टक्के कर लावण्याचीही शिफारस केली होती. सरकारला डीटीसी विधेयक संसदेत मांडायचे असेल तर ते आगामी अधिवेशनातच आणावे लागेल. कारण यानंतर लेखानुदान सादर करण्यासाठी अधिवेशन बोलावले जाईल. या अधिवेशनात महत्त्वाची विधेयके पारित होऊ शकणार नाहीत.
सध्याचे स्लॅब
० दोन ते पाच लाख : 10 %
० पाच ते 10 लाख : 20 %
० यापेक्षा अधिक : 30 %
सुपर रिच श्रेणी
आता ‘सुपर रिच’ या श्रेणीचीही तरतूद केली जात आहे. यात श्रेणीतील लोकांना 30 टक्क्यांपेक्षा अधिक दराने कर भरावा लागेल.