आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट फंडाच्या करावरील पूर्वलक्षी प्रभाव रद्द, रिटर्नला विलंब शुल्काबाबत दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने म्युच्युअल फंड तसेच प्राप्तिकरदात्यांसाठी काही सवलती जाहीर करून दिलासा दिला आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास विलंब झाल्यास दैनंदिन आधारावर दंड भरावा लागणार्‍या प्रस्तावावर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ तारतम्याने निर्णय घेईल, असे केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले. या मुळे प्राप्तिकर विवरण पत्र भरणार्‍या करदात्यांना दिलासा मिळाला आहे. डेट म्युच्युअल फंडांवर आकारण्यात येणार्‍या 20 टक्के कराची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने न होता, 10 जुलैपासून लागू होईल, असे जेटली यांनी स्पष्ट केले. प्रस्तावानुसार हा कर एक एप्रिल 2014 पासून लागू होणार होता. यामुळे असा फंड खरेदी करणार्‍या गुंतवणूकदारांचा फायदा होणार आहे. आता एक एप्रिल ते 10 जुलै 2014 या काळात खरेदी करण्यात आलेल्या डेट फंडावर 10 टक्के कर आकारण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने म्युच्युअल फंड तसेच प्राप्तिकरदात्यांसाठी काही सवलती जाहीर करून दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे सामाज कल्याण कामासाठी अधिकाधिक स्रोतांची उभारणी तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उद्योगांना चालना देण्यासाठी कराचे प्रमाण कमी ठेवण्याचेही अभिवचन दिले आहे. डेट म्युच्युअल फंडांवर आकारण्यात येणार्‍या 20 टक्के कराची अंमलबजावणी अगोदरच्या एक एप्रिल 2014 च्या प्रस्तावाऐवजी 10 जुलै म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्याच्या तारखेपासून करण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री जेटली यांनी सांगितले. पूर्वलक्षी कर अंमलबजावणी करण्यात येऊ नये, अशी कॉँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि काही अन्य सदस्यांनी केलेल्या सूचना स्वीकारल्याचे जेटली म्हणाले.

नेमके काय झाले
> डेट म्युच्युअल फंडातील युनिट खरेदीवर दीर्घकालीन भांडवली नफा 10 टक्क्यांवरून 20 टक्के करणार, हा कर पूर्वलक्षी प्रभावाने 1 एप्रिल 2014 पासून लागू, असा प्रस्ताव अर्थसंकल्पात होता.
> डेट फंडांच्या खरेदीवरील कर आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने न करता 10 जुलैपासून करावी. याचाच अर्थ असा की डेट फंडावर आता 10 जुलैपासूनच्या खरेदीवर 20 टक्के कराची आकारणी सुरू होणार.

फायदा काय
एक एप्रिल ते 10 जुलै या काळात डेट म्युच्युअल फंडाची खरेदी केलेल्या ग्राहकांची वाढीव 10 टक्के कर देण्यापासून सुटका.