आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- सोमवारी संसदेत सादर होणार्या लेखानुदानात प्रत्यक्ष करात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनुसार सेवा कराच्या निगेटिव्ह यादीत आणखी सेवांचा समावेश होऊ शकतो. तसेच अर्थचक्राला आणखी गती देण्यासाठी पायाभूत संरचनेशी निगडित काही क्षेत्रांत दिलासा मिळू शकतो.
वित्त मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्याच्या मते, लेखानुदानात मांडण्यात येणार्या बहुतेक बाबींवरील चर्चेच्या फेर्या आता आटोपल्या आहेत. ज्या बाबी प्रामुख्याने मांडायच्या आहेत त्या अधोरेखित करण्यात आल्या आहेत. काही बाबींबाबत शेवटच्या क्षणी निर्णय घेण्यात येणार आहे. या बाबीत मुख्यत्वे करसंबंधी घटकांचा समावेश असून करामध्ये काही प्रमाणात सूट मिळण्याचे संकेत आहेत. लेखानुदान असल्यामुळे संसदेची परवानगी घ्यावी लागणार्या तरतुदी यात मांडण्यात येणार नाहीत. ज्या बाबी लागू करण्यासाठी कार्यकारी आदेशांची (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर) आवश्यकता असते अशाच तरतुदी लेखानुदानात मांडण्यात येतात. प्राप्तिकराच्या बाबतीतही लेखानुदानात विशेष वाढ किंवा घट होण्याची शक्यता नाही.
अधिकार्याच्या मते, सेवा कराच्यासंबंधी काही सेवा नकारात्मक यादीत (निगेटिव्ह लिस्ट) समावेश होण्याची शक्यता आहे. जेव्हापासून सेवा कर क्षेत्रात निगेटिव्ह लिस्ट पद्धती लागू झाली आहे. घोषित सेवा सोडून इतर सर्व प्रकारच्या सेवा या कराच्या कक्षेत आल्या आहेत.एकीकडे सर्वप्रकाराच्या सेवांवर कर लागत असला तरी सेवा कर चुकवण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊनच आता लोकांशी जास्तीत जास्त संबंध येणार्या सेवांचा यात समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावर सेवाकर लागणार नाही. तसेच यामुळे महसुली तूट मोठय़ा प्रमाणावर वाढणार नाही याकडेही लक्ष देण्यात आले आहे. पायाभूत संरचनेशी निगडित काही क्षेत्रांना यात सूट मिळण्याची शक्यता आहे.
लेखानुदानात उत्पादन शुल्कांशी निगडित काही घटकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाहन उद्योगात सध्या अडचणी असल्याचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे वाहन उद्योगाशी निगडित उत्पादन शुल्कात कपात केली जाण्याची शक्यता आहे. अवजड उद्योग मंत्रालयातील एका अधिकार्याच्या मते, उत्पादन शुल्क कपातीबाबत वित्त मंत्रालयाने सकारात्मक संकेत दिले आहेत.
दिलासा:
0 सेवा कराच्या नकारात्मक यादीत आणखी सेवांच्या समावेशाची शक्यता
0 पायभूत संरचनेशी निगडित काही क्षेत्रांना मिळू शकतो दिलासा
0 वाहन उद्योगांसारख्या क्षेत्रात उत्पादन शुल्क कपातीच्या माध्यमातून दिलासा
निराशा:
0 प्राप्तिकराच्या बाबतीत काही विशेष वाढ-घटीची शक्यता नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.