आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करदाते अडचणीत: मोबाइल अ‍ॅपवरून भरलेले आयकर विवरण पत्र अमान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आयकर विवरण पत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) दाखल करणारे करदाते अडचणीत आले आहेत. हे रिटर्न मंजूर केले जाणार नाही, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) स्पष्ट केले आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या एकाही मोबाइल अ‍ॅपला अद्याप सीबीडीटीने मान्यता दिलेली नाही.

अहमदाबादचे कर सल्लागर प्रमोद पोपट यांनी सांगितले की मोबाइल अ‍ॅप्सवरून रिटर्न अपलोड केल्यामुळे ती माहिती (डाटा) आयकर विभागाला विवक्षित फॉर्मेटमध्ये मिळेलच याची निश्चिती नसते. आयकर विभागाच्या दृष्टीने असा डाटा कुचकामी ठरतो. हे अ‍ॅप्स तयार करणाºया कंपन्यांनी सीबीडीटीची मंजुरीही घेतलेली नाही. यामुळे अ‍ॅपद्वारे भरलेला ई-रिटर्न अमान्य केला गेला असावा, असे त्यांनी सांगितले.

अ‍ॅपला सीबीडीटीची मान्यता नाही
० अनेकांनी टॅक्सस्पॅनरसारख्या वेबसाइट्सद्वारे ई-रिटर्न भरले.
० यामुळे बंगळुरूतील ई-रिटर्न सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरच्या तांत्रिक अडचणी वाढल्या.
० मोबाइल अ‍ॅप्सवरून रिटर्न अपलोड केल्यामुळे डाटा आयकर खात्याला विवक्षित फॉर्मेटमध्ये मिळेलच याची निश्चिती नसते.
० याचा धडा घेत रिटर्नसाठी सीबीडीटी आपले स्वत:चे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करत आहे.