आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करदात्याच्या उत्पन्नातून वजा मिळणा-या विविध रकमा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर कायद्यामध्ये करदात्यांनी (व्यक्ती अथवा हिंदू अविभक्त कुटुंब) केलेले काही खर्च शंभर टक्के वजा मिळतात, तर काही खर्चांना कमी वजावट मिळते. यात एकूण 30 पेक्षा अधिक वेगवेगळ्या खर्चांबाबत किंवा उत्पन्नाबाबत वजा मिळतात. यासाठी काही अटी नमूद केलेल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे.
अ) एकूण उत्पन्नातून वजा मिळते. म्हणजे नुकसान असल्यास वजा मिळत नाही.
ब) या कलमांखाली मिळणारी वजा रक्कम एकूण उत्पन्नापेक्षा जास्त मिळू शकत नाही.
क) करपात्र उत्पन्नातूनच गुंतवणूक केलेली असली पाहिजे.
ड) करदात्याने वजावट मागितल्याशिवाय मिळत नाही.
इ) एकूण उत्पन्न त्या प्रकरणासाठी म्हणजे दीर्घ किंवा अल्प भांडवली स्वरूपाचा नफा समाविष्ट असेल, तर तो नफा वजा करून आलेली रक्कम होय.
या प्रकरणात काही ठळक वजा मिळणा-या रकमा खालीलप्रमाणे होय.
कलम 80 सी :
1. विमा हप्ता, शिक्षण फी (जास्तीत जास्त दोन पाल्यांसाठी) पी. पी. एफवरील खर्च करदाता स्वत:साठी, पती-पत्नी, मुलांच्या अथवा मुलींच्या नावानेसुद्धा करू शकतो.
2. कर्मचा-याने मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीत भरलेली रक्कम.
4. राष्ट्रीय बचत पत्र
5. कलम 10 (23 डी) मध्ये नमूद केलेल्या म्युच्युअल फंडामध्ये अथवा म्युच्युअल फंडाच्या पेन्शन फंडात भरलेली रक्कम.
6. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये दाखवण्यात आलेले निवासी घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी नमूद केलेल्या हाऊसिंग बोर्ड, विकास संस्था, बँका, आयुर्विमा महामंडळ, सोसायटी इत्यादींना कर्ज परतफेड केली असल्यास त्यामधील मुद्दलाची रक्कम, स्टॅप्म ड्यूटी, नोंदणी फी किंवा इतर खर्च (परंतु जर घर विकत घेतल्यापासून पाच आर्थिक वर्षात विकले तर वजावट मिळालेली सर्व रक्कम ही ज्या वर्षी विकले त्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नात धरले जाईल)
7. बँका आणि तत्सम संस्था ज्या नमूद केलेल्या आहेत. त्यात कमीत कमी 5 वर्षांसाठी मुदत ठेव.
8. नाबार्डचे निर्देशित रोखे (बाँड)
9. पोस्ट ऑफिस मुदत ठेव नियमांतर्गत 5 वर्षांसाठी मुदत ठेव.
टीप : कलम 80 सी, सीसीसी आणि सीसीडीमध्ये एकत्रित वजावट अधिकतम एक लाख रुपयांपर्यंत मिळते.
agra_chetan@yahoo.co.in