आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती, ह्युंदाईच्या कार महागल्या, स्पार्क, बीटच्या किमतीत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने वाहनांवरील अबकारी शुल्क सवलत कपातीला मुदतवाढ न दिल्याने वाहन कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी होंडाने किमती वाढवल्यानंतर मंगळवारी मारुती, ह्युंदाई, जनरल मोटर्स या कंपन्यांनी आपल्या सर्व मॉडेलच्या किमतीत वाढ केली आहे. मारुती-सुझुकीने सर्व कारच्या किमतीत ३१,६०० रुपयांपर्यंत वाढ केली असून ती एक जानेवारीपासून लागू होईल.
ह्युंदाई मोटर्स इंडिया कंपनीने आपल्या सर्व कारच्या किमतीत १५ हजार ते १.२७ लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. नव्या िकमती एक जानेवारीपासून लागू होतील असे ह्युंदाईने स्पष्ट केले. अबकारी शुल्क वाढ व कच्च्या मालाच्या महागाईचे कारण देत जनरल मोटर्स इंडियानेही आपल्या सर्व कारच्या किमती ६१ हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. नव्या किमती जानेवारीपासून लागू होतील, असे जनरल मोटर्सने म्हटले आहे.
ह्युंदाई कारच्या नव्या किमती
मॉडेल वाढ नवी किंमत
ई-ऑन १५,४१७ २.८८ ते ४.०३ लाख
आय-१० २१,५०१ ३.९९ ते ४.७७ लाख
ग्रँड आय १० २२,५०८ ४.४१ ते ६.४३ लाख
एक्सेन्ट २५,५९७ ४.७३ ते ७.४७ लाख
इलाइट आय२० २९,८१४ ४.९९ ते ७.६६ लाख
व्हेर्ना २३,९६५ ७.३९ ते ११.७२ लाख
इलान्ट्रा ३६,९१२ १२.९२ ते १६.२४ लाख
सोनाटा ४५,३९६ १८.७४ ते २०.७८ लाख
मारुती व जनरल मोटर्सची वाढ
मॉडेल वाढ नवी किंमत
अल्टो ८५०० ते १२,७०० २.३७ ते ३.५२ लाख
वॅगन आर १२,५०० ते १५,७०० ३.४८ ते ४.३५ लाख
स्विफ्ट १५,८५० ते २५,१५० ४.४२ चे ६.९५ लाख
डिझायर १७,५०० ते २६,६५० ४.८५ ते ७.३२ लाख
सेलेरिओ १३,६०० ते १७,२०० ३.७६ ते ४.७८ लाख
सियाझ २२,४५० ते ३१,६०० ६.९९ ते ९.८० लाख
अर्टिगा १८,७५० ते २७,७५० ५.८ ते ४.८९ लाख
ओम्नी ७,८५० ते ९,९५० २.१७ ते २.७५ लाख
स्पार्क १८,३०० ३.६ ते ४.१ लाख
बीट १८,३०० ४.२ ते ६.२८ लाख
सेल २० ते ३६ हजार ४.६६ ते ७.१८ लाख
एन्जॉय २४ ते ३५ हजार ६.१० ते ८.६२ लाख
तवेरा २४ ते ६० हजार ९.२५ ते ११.२९ लाख
(सर्व किमती रुपयांत, एक्स शो रूम दिल्ली)